पश्चिम महाराष्ट्र

दानशुरांनी दिला हात; पाच दिवसांत लेडिज हॉस्टेलचे झाले कोविड रुग्णालय

अजित झळके

सांगली : कोरोना संकट काळात रुग्णांना (corona patients) बेड मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा कठीण प्रसंगात लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नेमिनाथनगर येथील कस्तुरबाई वालचंद लेडिज हॉस्टेलचे (walchand ledies hostel) पाच दिवसांत कोरोना हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्याची किमया साधली आहे. भगवान महावीर कोविड केअर सेंटर (mahavir covid center) संकटात सक्षमपणे सेवा देत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत याच संस्थेने २७५ हून अधिक रुग्णांना जीवदान दिले. आता पुन्हा ते सज्ज झालेय. राष्ट्रवादीचे प्रदेश (NCP) उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने रुग्णालय उभे राहिले. ते मुख्य समन्वयक आहेत. केवळ संच उभारून न थांबता सांगली, (sangli, miraj) मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम काम करीत आहे. येथे ४० बेडची सुविधा असून १५ बेड आयसीयू व्हेंटीलेटर व हायफ्लो नेझलयुक्त आहेत. जैन समाजातील दानशूरांच्या मदतीतून ७५ लाखांची वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आलीत.

लेडीज हॉस्टेलचे रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी ऑक्सिजन फिटिंग (oxygen) सुनील कोथळे, इलेक्ट्रिक सुविधा रमेश खोत, सागर जोशी, ऑक्सिजन व्यवस्थेला अशोक शिंदे, अमोल चौगुले, तसेच संजय आवटी, डॉ. दिनेश बभान यांनी हातभार लावला. डॉ. बी. एस. पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. अमोल पाटील, डॉ. प्रीतम आडसुळे, डॉ. अमोल सकळे यांच्यासह १५ डॉक्टर, २० परिचारिका आदी ४० जणांची टीम तैनात आहे. २२ खोल्यांत स्वतंत्र टॉयलेट बाथरूमची सोय, मोकळी हवा, पौष्टिक आहार, काढा यामुळे रुग्ण कोरोनावर लवकर मात करीत आहेत.

दहा दिवसांत येथे १०० रुग्ण दाखल झाले. ८० कोरोनामुक्त झाले. पाटील म्हणाले,‘‘जैन समाजातील दानशूरांच्या मदतीने हे रुग्णालय उभे राहिले. सुभाष बेदमुथा, जितेंद्र नाणेशा, अजित पाचोरे, राजगोंडा पाटील, वसंत पाटील, सुभाष देसाई यांचे सहकार्य लाभले. सामाजिक एकजुटीतून संकटाशी दोनहात करण्यात यश येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT