Cow Milk Google
पश्चिम महाराष्ट्र

गाय दुधाच्या दरासाठी शेतकरी संघटनेचा उद्या मुंबईत मोर्चा

गाय दुधाच्या दरातील ८ हजार ३०० कोटी फरकाची प्रतिक्षाच.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : राज्य शासनाने गायीच्या दुधाला सन २०१७-१८ मध्ये दर जाहीर केला होता. तब्बल तीन वर्षानंतर फरकाचे ८ हजार ३७० कोटी रुपये रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम तातडीने मिळावी, यासाठी रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. २९) रोजी दुग्ध आयुक्त कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. त्यानंतर कृषी आणि घरगुती वीजबिलाच्या माफीसंदर्भात महावितरण कार्यालयाबाहेरही आंदोलन केले जाणार आहे.

दूध उत्पादकांची सरकारसह खासगी दूध संघाकडून लुट सुरुच आहे. सन २०१७ -१८ मधील दुध दर फरकाचे ८ हजार ३७० कोटी रुपये दरफरक अद्याप मिळालला नाही. शेतकरी हा फरक आता विसरु लागले आहेत. राज्यात गायीच्या दूधाचे उत्पादन वाढल्यामुळे दरात काही सुधारणांची चिन्हे नाहीत. दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन केली. मात्र त्याच संघटना फरक मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाही.

संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी सांगितले की, राज्यातील गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यसाठी राज्य शासनाने उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर २७ रुपये देण्यासाठी पहिला आदेश १९ जून २०१७ रोजी काढला. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टींच्या आंदोलनातील तडजोडीनुसार सरकारने वीस अधिक पाच दरासाठीचा आदेश २७ सप्टेंबर २०१८ रोजी काढला होता. या दोन्ही आदेशामधील अंतर एक वर्ष तीन महिने सहा दिवस अंतरातील शेतकऱ्यांच्या दूध दरातील फरकाचे बील महाराष्ट्रातील सुमारे ८ हजार ३७० कोटी रुपयांची रक्कम आहे. या थकित दूध बिलासंदर्भात शेतकरी संघटनेच्यावतीने पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, इंदापूर तालुकाध्यक्ष हरिदास पवार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुग्ध आयुक्त कार्यालयावर दुपारी एक वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

न्यायालयाने शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे पैसे देणे बंधनकारक असल्याबाबतचे आदेश दिले. मात्र शेतकऱ्यांना फरकाची रक्कम अद्याप मिळाली नाही. यासाठी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुग्ध आयुक्त कार्यालयावर दुपारी एक वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर कृषी, घरगुती वीजबिलाच्या माफीसंदर्भात महावितरण कार्यालयाबाहेरही आंदोलन केले जाणार आहे. या मोर्चासाठी दूध उत्पादकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: अजित पवार यांनी दिल्लीत घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Ayushman Bharat : अलर्ट! 5 लाखपर्यंतचे मोफत उपचार होतील बंद; आयुष्मान कार्ड असल्यास अजिबात करू नका 'ही' 1 चूक, मिळणार नाही कोणतीच सुविधा

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! 15 षटकार अन् 11 चौकरांसह आशिया कपमध्ये शतकी झंझावात

Nilam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हे ॲक्शन मोडमध्ये; गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडे केली 'या' १० महत्त्वाच्या उपाययोजनांची मागणी

Pune Navale Bridge Accident : 'रोड इंजिनिअरिंग'च्या चुका आणि प्रशासनाचे दुर्लक्षच ठरले 'मृत्यूचा सापळा'

SCROLL FOR NEXT