sugar-mill-660_041818020010_050418015027.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ऊस उत्पादकाच्या खिशावर कोयता 

सकाळवृत्तसेवा

सांगली, :  जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात सुरु आहे. ज्या कारखान्यांनी हंगाम संपवला आहे त्या कारखान्याच्या हद्दीत सरासरी दीड ते दोन हजार एकर ऊस गाळपावीना शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. सध्या साखराळेचा राजारामबापू, वाळव्याचा हुतात्मा आणि कुंडलचा क्रांती या साखर कारखान्यांचे हंगाम सुरु आहेत. अन्य कारखान्यांचे हंगाम संपलेत. कारखाना कार्यक्षेत्रात सभासद आणि गेटकेन नोंदीचा ऊस अद्याप दहा-बारा दिवस सुरु राहण्याची शक्‍यता आहे. 

"कोरोना' च्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूरांना गावाकडे जाण्याचे वेध लागलेत. शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावणार आहे. ऊस तोड लवकर व्हावी म्हणून काही ठिकाणी फड पेटवण्याचे प्रकारही घडू लागलेत. ऊस शिल्लक राहू नये यासाठी कारखान्यांनी संबंधित मजुरांची सर्व सोय करावी, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. उन्हाच्या तडाख्याने मजूर हैराण झालेत.

उसाला आलेले तुरे, वाटा, ऊसांत उंदरांचा वावर अशी कारणे सांगून मजुरांकडून तोडीसाठी एकरी दहा हजारांची मागणी केली जात आहे. 
कवलापूर परिसरात एका कारखान्याने शेवटच्या दोन दिवसांत ऊस तोडला. काही ऊस गाळपास नेला आणि 25 ते 30 टक्के ऊस फडात पडून आहे. शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याच्या विचारात आहे. मात्र संचारबंदीच्या अंमलबजावणींमुळे ते सध्या थांबले आहेत. 

ेशेतातल्या उसाची धास्ती 

जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र एक लाख 80 हजार एकर आहे. गेल्या वर्षी टंचाई, महापूर आणि अतिवृष्टी झाली. त्याचा परिणाम झाला. सुरवातीला "एफआरपी' च्या वादातून गाळप विलंबाने सुरु झाले. हंगाम सांगतेवेळी "कोरोना' आला. त्यामुळे शिल्लक ऊसाची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. मजूर त्याचा फायदा घेत आहेत. पैशाची मागणी सुरु झाली आहे. पिक वाया जाणार, पैसीे जाणार याची धास्ती वाढली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT