Crime 10 years sentence for abusing minor girl force Torture sangli police
Crime 10 years sentence for abusing minor girl force Torture sangli police  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

सांगली : पलूस तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. नागेश हंबीरराव होवाळ (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.

फेब्रुवारी २ आरोपी होवाळ याने पीडितेला खून करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. सांगलीतील एका केंद्रात तिला दाखल केले व पोलिसांत होवाळविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. बोंदर, बी. डी. ढेरे यांनी केला. घटनास्थळाचा पंचनामा व पीडितेचे, डीएनए सॅम्पल न्यायवैद्यानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यानंतर होवाळेविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकारपक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडिता, तिची आई यांचा जबाब, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायनिवाडे या सगळ्यांचा विचार करून होवाळ यास दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. कारावासासह ३० हजार रुपये दंड भरण्याचेही आदेश दिले. कुंडल पोलिस ठाण्याचे कर्मचारी संभाजी शिंदे, पैरवी कक्षातील सुनीता आवळे, वंदना मिसाळ, दीपाली सूर्यवंशी यांचे सरकार पक्षाला सहकार्य मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT