Crime against Dhokeshwar Multistate president 
पश्चिम महाराष्ट्र

ढोकेश्वर मल्टीस्टेटच्या अध्यक्षांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

बार्शी (सोलापूर) : शहरातील व ग्रामीण भागात विस्तारलेल्या राज्यात 120 शाखा असे सांगणाऱ्या ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीने आकर्षक व्याज दराचे अमिष दाखवून वाणेवाडी ( ता. बार्शी) येथील शेतकऱ्याची तीन लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलिसांत दाखल झाला आहे.अध्यक्ष सतीश काळे यांचेसह संचालक मंडळ, व्यवस्थापक यशवंत गाडे (सर्व रा. लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना 16 सप्टेंबर 2016 ते 29 एप्रिल 2018 दरम्यान घडली. शंकर गायकवाड या शेतकऱ्याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. 
शहरातील बस स्थानकासमोर ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को ऑप. क्रेडीट सोसायटीची शाखा उघडण्यात आली होती. बचत ठेव, मुदत ठेव असे सांगून कर्मचारी, व्यवस्थापक दूरध्वनीद्वारे अध्यक्षांशी बोलणे ग्राहकांना करुन देत होते. तुम्ही पैसे भरा असं म्हणून 16 सप्टेबर 2016 रोजी 13 महिन्यांसाठी 13 टक्के व्याजाने पैसे घेऊन 16 ऑक्टोबर रोजी एक लाख 14 हजार 83 रुपये अशी हमी देऊन मला पावती दिली. त्यानंतर शेताचे पिकाचे पैसे आले म्हणून 29 मार्च 2017 रोजी 13 महिन्यांसाठी 13 टक्के व्याजदराने फिक्स डिपॉझीट पावती केली. 29 एप्रिल 2018 रोजी दोन लाख 28 हजार 167 मिळण्याची हमी देऊन पावती दिली. पावतीची मुदत संपल्यानंतर पैसे मागण्यासाठी वारंवार पैसे मागण्यास गेलो असता पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. दूरध्वनी बंद आहेत. विश्वासघात केल्याचे समजताच संचालक मंडळाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार वरपे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT