crime case in belgaum for one man he dead and arrested police 
पश्चिम महाराष्ट्र

नातेवाईकांनी विन्सेंट बोलवून गळा आवळून त्याचा खूनच केला होता ; तपासात झाला खुलासा

सकाळ वृत्तसेवा

खानापूर (बेळगाव) : तिओली वाडा (ता. खानापूर) येथील विन्सेंट ऊर्फ इशांती बस्त्याव परेरा (वय २७) याचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ॲलेक्‍स परेरा याला अटक केली असून अन्य तिघे फरारी आहेत. विन्सेंटचा ४ जोनवारीस गवतगंजीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.

विन्सेंटचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्याला बोलवून घेऊन गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा मिटविण्यासाठी त्याचा मृतदेह गवतगंजीत टाकून पेटवून दिला. त्याने स्वत:च गवतगंजीत झोकून देऊन आत्महत्या केल्याचा बनाव संशयित आरोपी ॲलेक्‍स परेरा व त्याच्या साथीदारांनी रचला. ४ जानेवारीला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सा केली. सुरुवातीपासून त्याचा खून झाला असण्याची शक्‍यता होती. त्या दिशेने तपास केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. 

विन्सेंटने स्वत:च गवतगंजीत झोकून देत पेटवून घेतले असते तर पोळल्यानंतर त्याने गवतगंजीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता, पण मृतदेह गवतगंजीतच राहिल्याने पोलिसांना संशय आला. तसेच शवचिकित्सा अहवालात त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तपासानंतर ॲलेक्‍सला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. अन्य तिघांचा शोध जारी असून पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील अधिक तपास करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT