crime case in belgaum one officer of HESCOM arrested by police 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात हेस्कॉम अधिकाऱ्यावर छापा; उत्पन्नस्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : उत्पन्न स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याच्या संशयावरून एसीबीच्या विशेष पथकाने हेस्कॉमच्या उपमुख्य पर्यवेक्षकाचे निवासस्थान व कार्यालय अशा चार ठिकाणी मंगळवारी (९) एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईअंतर्गत त्यांचे घर, मुलाच्या नावे असलेले फ्लॅट व दुकानासह दागिन्यांची माहिती घेण्यात आली. हणमंत शिवाप्पा जक्कण्णावर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

याबाबत एसीबी अधिकाऱ्यांनी दिलेली अधिक माहिती अशी, हेस्कॉममध्ये उपमुख्य पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेल्या जक्कण्णावर यांचे चन्नम्मानगरमध्ये निवासस्थान आहे. तेथे ते कुटुंबासह राहतात. या निवासस्थानासह त्यांच्या हेस्कॉममधील कार्यालयातही छापा टाकून तपासणी करण्यात आली. संशयित जक्कण्णावर यांच्याकडे चन्नम्मानगरमधील भव्य निवासस्थान, दोन फ्लॅट, एक पेंटहाऊस आणि चार दुकाने आढळली आहेत. तेथे एक रेडिमेड कपड्यांचे दुकान आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकान आहे. 

सुमारे ७५ हजारांचे कपडे आणि ६५ लाखांच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच घरात ८१६ ग्रॅम सोने, ६,३१७ ग्रॅम चांदी मिळून १ लाख ८८ हजार ३० रुपयांचे दागिने मिळाले आहेत. कारवाईत अपर पोलिस महानिरीक्षक सिमंतकुमार सिंग, प्रभारी पोलिस महानिरीक्षक कुलदीपकुमार जैन, उत्तर विभागाचे पोलिस अधीक्षक बी. एस. न्यामगौडर, उपाधीक्षक जे. एम. करुणाकरशेट्टी, पोलिस निरीक्षक सुनीलकुमार, एस. एस. गोदीगोप्प, वाय. एस. धरनाईक, समीर मुल्ला, विश्‍वनाथ चौगुले आदींनी भाग घेतला होता. 

मूळ गाव गोलभावीतही छापा

जक्कण्णावर यांनी मुलगा तुषारच्या नावे चन्नम्मानगरमधील शांतिनाथ होम्स या अपार्टमेंटमध्ये एक दुकान व दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. त्याचीही तपासणी करून माहिती घेण्यात आली. जक्कण्णावर यांचे मूळ गाव गोलभावी (ता. जमखंडी) असून तिथेही छापा टाकण्यात आला.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT