crime case in belgaum one person suicide in closed theater in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बंद चित्रपटगृहात घडली धक्कादायक घटना ; दृश्य पाहताच भुवया उंचावल्या

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : येथील बस स्थानक आवारातील बंद स्थितीतील गीतांजली चित्रपटगृहात एकाने आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या पुरुषाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. त्यामुळे ओळख पटणे मुश्‍कील बनले आहे.

बस स्थानक आवारातील मुरगूड रोडवरील चित्रपटगृह अनेक वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने आवारात गवत, झुडूप वाढले असून, दलदल निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून मुरगूड रोड परिसरात दुर्गंधी येत होती. पोलिसांनी शोध घेतला असता सायंकाळी चित्रपटगृहात एकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. 

चित्रपटगृहात स्टेजच्या बाजूला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर पॅन्ट, शर्ट असून, त्याने तोंडाला मास्क लावला आहे. मृतदेहाचा सांगाडा असल्याने अनेक दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा अंदाज आहे. रात्री निपाणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात विच्छेदनासाठी हलविला. दरम्यान, चित्रपटगृह परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबतची चर्चा शहरात ठिकठिकाणी सुरू होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉन्सूनची चाल मंदच, राज्यात 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन

Abhijit Dipke: आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा म्हणणं समजून घ्या, देशात आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न : अभिजित दिपके

Petrol Excise Duty: पेट्रोल स्वस्त होणार? सरकारकडून उच्च इथेनॉल पेट्रोलवरील कर माफ; पण E30 मुळे वाहनधारकांची चिंता वाढणार?

Vaibhav Sooryavanshi: मुलासाठी विकली वडिलोपार्जित जमीन; आता वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी जे सांगितलं, ते ऐकून तुम्हीही भावुक व्हाल...

Smart Prepaid Meter : लाईटबिल भरण्याची कटकट संपवा! ५०० रुपयांच्या रिचार्जवर किती दिवस चालतो स्मार्ट प्रीपेड मीटर? पैसे वाचवणार

SCROLL FOR NEXT