पश्चिम महाराष्ट्र

उसाच्या फडात आढळला महिलेचा मृतदेह; कोळीगुड येथील घटना

मयत महिला महाराष्ट्रातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

रायबाग : अथणी-गोकाक मार्गावरील कोळीगुड येथे आज उसाच्या फडात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून खून केला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मयत महिला महाराष्ट्रातील असल्याची शक्यता आहे. हारुगेरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. (crime case)

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रायबाग तालुक्यातील कोळीगुड या गावातील केदारी जुमनाळ उर्फ इटगीहाळ यांच्या शेतात एका 35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह उसाच्या फडात आढळला आहे. त्या महिलेच्या अंगावर लाल साडी, निळे ब्लाऊज असून डाव्या हातावर कन्नडमध्ये यमनप्पा तर मराठीत तरवीर लिहिले आहे. (crime news, koligud) तसेच उजव्या हातावर महादेव लिहिले आहे. प्रथम दर्शनी या महिलेचा गळा आवळून खून केल्याचा संशय आहे. मृतदेहाजवळ पट्टा, गळ्यात दुपट्टा असल्याने खूनाचा संशय वाढला आहे. या महिलेचा गळा आवळून मारल्याचा संशय दिसून येत आहे. ही महिला महाराष्ट्रातील असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. हा प्रमुख मार्ग असतानाही पहाटेच्यावेळी वाहतूक नसताना ही घटना घडली आहे. (police action)

घटनास्थळी अथणीचे पोलिस मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी यांनी भेट देऊन पाहणी केली. हारुगेरीचे उपनिरीक्षक राघवेंद खोत तपास करत आहेत. हारुगेरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. उतरणीय तपासणीसाठी मृतदेह बेळगावच्या बिम्स रुग्णालयाला पाठवला आहे. पोलिसांसमोर खुनाचे रहस्य उलघडण्याचे आव्हान आहे. या खुनामुळे कोळीगुड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT