Crime  sakal media
पश्चिम महाराष्ट्र

रेकॉर्डवरील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा रेकॉर्डवरील आरोपीला विटा पोलिसांनी पकडले.

दिलीप कोळी

सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा रेकॉर्डवरील आरोपीला विटा पोलिसांनी पकडले.

विटा : सांगली, सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा रेकॉर्डवरील आरोपीला विटा पोलिसांनी पकडले. सिताराम लक्ष्मण येडगे ( वय २८, रा. पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील दहा लाख बारा हजार रुपये किंमतीचे चोरीचे साहित्य जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.

करंजे ( ता. खानापूर ) येथील शिवेच्या मळ्यातून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर ४ ऑगस्ट २०२१ रोजी चोरी झाल्याची फिर्याद मारूती विठोबा माने ( करंजे ) यांनी विटा पोलिसात दिली होती. त्याचा तपास करत असताना खबऱ्याद्वारे माहिती मिळाली असता आरोपी येडगे याला विटा येथे ताब्यात घेण्यात आले. त्यास अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सांगली व सोलापूर जिल्ह्यात चो-या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केलेला ३ लाख ३४ हजाराचा एक ट्रॅक्टर, ४ लाख ५८ हजार रूपयांचे सहा रोटर, ५५ हजाराचे एक औषध फवारणी करण्याचे यंत्र, ९९ हजाराचे स्टाईल फरशीचे ९९ बॉक्स, ५० हजार रुपये किंमतीचे एक टन लोखंडी अॅंगल, ४ हजार ५०० रुपयांची आठ सिमेंट पत्र्याची पाने व १२ हजाराचे आठ रंगाचे डबे असा १० लाख १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर कवठेमहांकाळ, आटपाडी, सांगोला, विटा पोलिसात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे श्री. डोके यांनी सांगितले.

ही कारवाई कारवाई पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष डोके, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पांडुरंग कन्हेरे, रवींद्र धादवड, हणमंत लोहार, शशिकांत माळी, सुरेश भोसले, प्रदिप पाटील, शिवाजी हुबाले, संतोष घाडगे, महेश खिलारी, सुहास खुबीकर, सुधाकर पाटील, लक्ष्मण गुरव, महावीर कांबळे, तुकाराम नागराळे, राजेंद्र भिंगारदेवे, अमर सुर्यवंशी, रोहित पाटील, श्री. गुंडवाडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT