crime cases in belgaum but injured person was not dead in accident in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

नशीब बलवत्तर म्हणून वाचला आणि गोळीचा निशाना त्याचा डावा हात ठरला

अमृत वेताळ

बेळगाव : मित्रासोबत कट्ट्यावर बसून गप्पा गोष्टी करणाऱ्या एकावर अज्ञात इसमाने गोळीबार करुन खून करण्याचा प्रयत्न केला. भरमा भुपाल धुपदाळ (वय 51, रा. हत्तरगी ता. हुक्‍केरी) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या अंगावर झाडण्यात आलेली गोळी डाव्या हाताला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. बुधवार (ता.16) रात्री 11.30 च्या सुमारास यमकनमर्डी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी यमकनमर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयिताच्या अटकेसाठी प्रयत्न करत आहेत. 

राज्यासह जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्याने रात्री जागु लागल्या आहेत. प्रचाराची गडबड असल्याने गटागटाने थांबुन लोक चर्चा करीत आहेत. काल रात्री 11.30 च्या सुमारास फिर्याद भरमा हे आपल्या मित्रासोबत यमकनमर्डी येथील बस्तीनजिक कट्ट्यावर बसून काही विषयांवर चर्चा करत होते. त्यावेळी तोंडावर मंकी कॅप घातलेला एक अज्ञात इसम त्याठिकाणी आला. त्याने कोणालाही काही कळण्याआधी आपल्या हातातील पिस्तुल भरमा यांच्यावर रोखून गोळी झाडली. गोळी भरमा यांच्या डाव्या हाताला लागल्याने ते गंभीर जखमी  अवस्थेत खाली कोसळले. त्यानंतर संशयित हल्लेखोराने तेथून पळ काढला.

दरम्यान जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऐन ग्रामपंचायत निवडणूकीच्या धामधुमीत गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती समजताच हुक्‍केरीचे मंडल पोलीस निरीक्षक जी. आय. कल्यानशेट्टी, यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संबधित अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरु आहे. 

गावठी पिस्तुलचा वापर केल्याचा संशय 

ग्राम पंचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकाकडून सर्व प्रकारच्या बंदुका संबधीत पोलीस ठाण्यात जमा करुन घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे काल रात्री वापरण्यात आलेली बंदुक विनापरवाना व गावठी असल्याची चर्चा आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT