crime cases in belgaum khanapur one lady and man dead 
पश्चिम महाराष्ट्र

२५ वर्ष एकत्र राहण्याचं गूढ कायम ; दोघांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

खानापूर (बेळगाव) : पंचवीस वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना नागुर्डा (ता. खानापूर) येथे उघडकीस आली. अशोक प्रभू होन्नूरकर (वय ५४) आणि लक्ष्मी पेद्रू नवनेर (वय ५०, दोघेही रा. गांधीनगर-हलकर्णी) अशी त्यांची नावे असून त्यांच्या मृत्यूबद्दल नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. खानापूर पोलिसांत घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. 

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, अशोक आणि लक्ष्मी हे दोघे विश्रांतवाडी-नागुर्डा रस्त्यावरील मुजावर पोल्ट्री फार्ममध्ये कामाला होते. गेल्या महिनाभरापूर्वीच ते येथे येऊन राहिले होते. रविवारी (ता. १४) रात्री पोल्ट्रीमालक पाहणी करण्यासाठी आले असता खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. त्यांनी हाक मारल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. रात्री दहाच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. 

त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. अशोक हे अविवाहित होते, तर लक्ष्मी या विधवा होत्या. गेल्या २५ वर्षांपासून ते एकत्र राहत होते. लक्ष्मी यांच्या मागे दोन मुलगे आणि दोन विवाहित मुली आहेत.

रविवारी ही घटना उघडकीस आली असली तरी त्यांचा मृत्यू शनिवारी रात्रीच झाला असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कारण शनिवारीदेखील खोलीचा दरवाजा आतून बंद होता. येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी (ता.१५) उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

New Marathi Book : मराठी भाषेच्या वर्तमानावर डॉ. सुधीर रसाळ यांचे परखड चिंतन

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

SCROLL FOR NEXT