crime cases in belgaum one person attack a women dead in attack in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

गायत्री पुढे जाताच मागून किंकाळ्या ऐकू आल्या, फिरुन पाहिले तर मैत्रिण झेलत होती तलवारीचे वार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : एकतर्फी प्रेमातून तलवारीने वार करून महिला सुरक्षारक्षकाचा खून केल्याची घटना बुधवारी (ता. ३०) जिल्हा रुग्णालय आवारात घडली. सुधाराणी बसाप्पा हडपद (वय २९, रा. मुगबसव, बैलहोंगल) असे तिचे नाव आहे. संशयित आरोपीला अवघ्या चार तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. इराण्णा जगजंपी (वय २४, रा. बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सुधाराणी आठ महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होत्या. मंगळवारी (ता. २९) रात्री सुधाराणी आणि गायत्री चिदानंद कलमठ (रा. तारीहाळ, सध्या रा. शिवाजीनगर) यांची ड्यूटी होती. दोघीही बुधवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी निघाल्या.

बालचिकित्सा विभागाजवळ अज्ञात दुचाकीस्वार सुधाराणी यांना भेटला. माझ्या परिचयाची व्यक्ती आलेली आहे. तू पुढे चल मी येते, असे त्यांनी गायत्री यांना सांगितले. गायत्री थोडे पुढे गेल्या असता त्यांना मागून किंकाळ्या ऐकू आल्या. मागे फिरुन पाहिले असता तो दुचाकीस्वार सुधाराणींवर तलवारीने वार करत असल्याचे दिसले. त्यामुळे त्या तिला वाचविण्यासाठी धावल्या. पण, हल्लेखोराने तलवारीचा धाक दाखविल्याने त्या जागीच थबकल्या. 

त्यांनी तातडीने पर्यवेक्षक चेतन राजेंद्र हवालदार (वय ३१) यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ते दोघे घटनास्थळी पोचले. त्यावेळी सुधाराणी निपचीत पडल्या होत्या. त्यांचा चेहरा, मान व शरीरावर गंभीर वार झाले होते. त्यांनी हल्लेखोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो तेथून पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी सहकाऱ्यांसह दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. तातडीने हल्लेखोराचा शोध सुरु करण्यात आला. अवघ्या चार तासांत पोलिसांनी संशयित इरण्णा जगजंपीला अटक केली. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली. 

प्रत्यक्षदर्शीमुळे सापडला संशयित

तलवार हल्ल्यात सुधाराणी ठार झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी गायत्री यांनी संशयिताची प्राथमिक माहिती दिली. संशयिताचे वर्णन आणि वाहनाचा (केए २२, एक्‍स ७३००) तपशील दिला. त्या माहिती आधारे संशयित जगजंपीला अवघ्या चार तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT