पश्चिम महाराष्ट्र

आईच्या निधनाने बसला धक्का; वडिलांसह 2 मुलींची आत्महत्या

तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली

सकाळ डिजिटल टीम

चिक्कोडी : पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने पती आणि दोन तरुण मुलींनी गळफास (crimecase) घेऊन आत्महत्या केली. चिक्कोडी तालुक्यातील (chikkodi) पोगत्यानट्टी गावात रविवारी (२०) ही दुर्दैवी घटना घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काडाप्पा रंगापुरे (वय ४७), मुली कीर्ती (वय २०) आणि स्फूर्ती (वय १८) अशी मयत कुटुंबियांची नावे आहेत. चिक्कोडी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पोगत्यानट्टी (ता. चिक्कोडी) गावातील चन्नव्वा रंगापुरे (वय ४०) यांना गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हा धक्का सहन न झाल्याने चन्नवाचा पती काडाप्पा रंगापुरे (वय ४७), मुली कीर्ती (वय २०) आणि स्फूर्ती (वय १८) या तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. घटनास्थळी चिक्कोडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. चिक्कोडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ

वडिलांसह दोन मुलींनी आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. या आधीच चन्नव्वाचे निधन झाले होते. आता काडाप्पासह कीर्ती व स्फूर्ती यांनी आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे पोगत्यानट्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT