File photo esakal
पश्चिम महाराष्ट्र

व्यसनमुक्तसाठी आला अन् दारूसाठी वीज टॉवरवर चढला

अथणीतील मद्यपीचा कोयनेत थरार, दारू मिळाल्यानंतर दहा तासानंतर खाली

सकाळ डिजिटल टीम

कोयनानगर : कोयना विभागातील रासाटी- आंबेघर येथील व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्तीची मात्रा घेण्यासाठी अथणी (बेळगाव) येथून मद्यपी आला होता. (crime News) व्यसनमुक्तीची मात्रा न घेताच दास्तान येथील विद्युत वाहिनीच्या ५० फूट उंच असणाऱ्या टॉवरवर चढून जीवघेणा स्टंट करत थरार निर्माण केला. (belgaum news) प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून त्याला खाली आणले. या मद्यपीला अटक केल्याची माहिती कोयना पोलिसांनी दिली. (belgaum Update)

कोयना विभागात रासाटी- आंबेघर येथील व्यसनमुक्ती केंद्रात अथणी येथून तीन जण बुधवारी मुक्कामी आले होते. त्यातील करिअप्पा तुकाराम कंटेकर (वय ४५) हा मद्यपी व्यसनमुक्ती केंद्रात न जाता जवळच असणाऱ्या ४४० केव्ही वीजवहन टॉवरवर चढला. ‘मी दारू सोडणार नाही, मला दारू पाहिजे. दारू मिळाली नाही तर उडी मारणार,’ असा पवित्रा घेत त्याने थरार निर्माण केला.

या मद्यपीला खाली उतरविण्यासाठी पोलिस, महसूल, वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी विनंती करत होते. अग्निशामक दलाच्या सेल्फी बेल्टचा आधार घेत वीज कर्मचारी टॉवरवरून गेलेल्या कर्मचाऱ्यांना हा मद्यपी दारू द्या मगच खाली येतो,’ असे सांगत होता. त्याच्या मागणीप्रमाणे दारू दिल्यानंतर दहा तासांनी त्याला टॉवरवरून खाली आणण्यात प्रशासनाला यश आले.

वीज कंपनीचे ७० लाखांचे नुकसान

हा मद्यपी वीजवाहक टॉवरवर चढल्याने त्याच्या जिवाला धोका पोचू नये, यासाठी टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तब्बल दहा तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे वीज कंपनीचे सुमारे ७० लाखांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT