minor girl esakal
पश्चिम महाराष्ट्र

बाप-लेकीच्या नात्याला काळिमा; जन्मदात्याचा मुलीवर लैंगिक अत्याचार

आटपाडी तालुक्यातील घटना; बापास पोलिसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा

या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका गावातील नराधम बापानेच स्वतःच्या दोन्ही मुलींचा विनयभंग करून एकीला घरापासून लांब नेऊन लैंगिक अत्याचार करून माणुसकीला काळिमा लावण्याची घटना घडली आहे. यासंबंधी नराधमाच्या पत्नीने पीडितेच्या आईने नराधमाच्या विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की हे कुटुंब मोलमजुरी करते. तालुक्यातील त्यांच्या मूळ गावांतून दुसऱ्याच्या गावात मोलमजुरी करण्यासाठी स्थलांतरित झाले आहे. या कुटुंबात पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली आहेत. संशयित आरोपीला दारूचे व्यसन आहे. काल दुपारी संशयित बापाने स्वतःच्या चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर लहान बारा वर्षीय मुलीला बोर घेऊन येऊ असे म्हणून बाहेर घेऊन गेला. शेतात स्व:ताच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला. या घटनेने मुलगी भयभीत झाली. तिने आई घरी आल्यावर अत्याचाराची माहिती सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नराधम बापास पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चशिक्षितांना मोठा धक्का! कमी शिक्षण असलेल्यांसाठी राखीव पदांवर दावा करता येणार नाही; Supreme Court चा महत्त्वाचा निर्णय

Tuljapur Temple: भवानीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची लूट, तुळजापूरमध्ये बोगस पुजारी, लुटारू एजंटांकडून श्रद्धेचा बाजार

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा

Shahuwadi Robbery : शाहूवाडीतील दुर्गम भागातील पाटीलवाडीत दरोडा; मायलेक जखमी, सोने, पैसे सगळेच लुटले

'दुप्पट परतावा’च्या आमिषाला पोलीसही बळी... कोल्हापुरातील रॅकेटची राज्यभर चर्चा; गुन्ह्याचा तपास करणारेच कसे अडकले?

SCROLL FOR NEXT