पश्चिम महाराष्ट्र

सांगली : घाणंदला एकाच कुटुंबातील 3 भाऊ बेपत्ता

सकाळ डिजिटल टीम

आटपाडी : घाणंद (ता. आटपाडी) येथील एकाच कुटुंबातील दोन सख्खे आणि एक चुलत भाऊ दुपारपासून गायब झाले. बऱ्याच शोधानंतर घाणंद तलावाच्या सांडव्यातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्यालगत दोन मुलांचे कपडे आणि चपला सापडल्याने दुर्घटना झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरा घटनास्थळी पाणबुडे दाखल झाले होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात आले आहे. तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते. त्याच्यालगतच अंकुश व्हनमाने व लहू व्हनमाने या दोन सख्ख्या भावांची शेतजमीन आहे. लगतच कालव्यातून पाणी वाहते. नेहमीप्रमाणे आज दुपारी तीनला घरातील कुत्रे सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय अंकुश व्हनमाने (वय १६), आनंदा अंकुश व्हनमाने (१५) हे सख्खे आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने (१७) गेले होते. सायंकाळी सहापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय, शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली.

रात्री आठला घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्यालगत विजय आणि आनंदा यांचे कपडे आणि चपला आढळल्या. त्यांच्याबरोबर नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला. एक बादली, त्याला बांधलेला दोरही सापडला. वैभवची माहिती मिळाली नाही. गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली आहे. रात्री साडेआठला घटनास्थळी तहसीलदार सचिन मुळीक, पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे दाखल झाले. पोलिस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोध घेतला. मात्र, पाण्याचा प्रवाह जादा व वेगात असल्याने मुलांचा तपास लागला नाही. दरम्यान, सांगलीहून पाण्यात बुडून शोध घेणारे पाणबुडे दाखल झाले आहेत. त्यांनी अंधारातच मुलांचा शोध सुरू केला. या घटनेने गावात आणि तालुक्यात खळबळ उडाली.

"मासेमारीसाठी मुले कालव्यावर आली असावीत, असा अंदाज आहे. गावकऱ्यांनी माहिती सांगितल्यावर तहसीलदारांबरोबर आम्ही सर्व घटनास्थळी दाखल झालो. गावकऱ्यांना सोबत घेऊन मुलांचा शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुले सापडली नव्हती."

- भानुदास निंभोरे, पोलिस निरीक्षक, आटपाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT