crime cases in sangli one brother attack on his big brother he dead 
पश्चिम महाराष्ट्र

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; डोळ्यासमोर घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला बसला धक्का

सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : तालुक्‍यातील करोली (एम) येथे किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत दोघा भावांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान खुनामध्ये  झाले. यामध्ये लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. मनोज वसंत इंगवले-देशमुख (वय ४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर नितीन वसंत इंगवले-देशमुख असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी संशयित नितीन वसंत इंगवले-देशमुख याला रात्री उशिरा अटक केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनोज वसंत इंगवले-देशमुख आणि नितीन वसंत इंगवले-देशमुख हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. या दोघांना वडिलांनी त्यांची वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन प्रत्येकी दीड एकरप्रमाणे दिली आहे. यापैकी मोठा भाऊ मनोज वसंत इंगवले-देशमुख यांच्या वाटणीच्या शेतात द्राक्षबाग आहे. या बागेत मंगऴवारी (१६) रोजी सांयकाळी शेतमजूर कामाला आले. यावेळी लहान भाऊ नितीन वसंत इंगवले-देशमुख याने दारूच्या नशेत या शेतमजुरांना शिवीगाळ केली. ही शिवीगाळ आणि अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार आठ वाजल्यापासून सुरू होते. या दोघांच्याही पत्नी सख्या बहिणी आहेत. या दोघींनी हे वाद मिटवले; पण धाकटा भाऊ नितीन वसंत इंगवले-देशमुख हा रात्री दहा वाजता पुन्हा दारू पिऊन आला. त्याने थोरला भाऊ मनोज वसंत इंगवले-देशमुख याच्याशी पुन्हा भांडण काढले आणि त्याला जोरदार मारहाण केली आणि घरातील लोखंडी सळी आणि लोखंडी पारीने मनोजच्या डोक्‍यात जोरदार वार केले. या हल्ल्यात मनोज वसंत इंगवले-देशमुख हे जागीच ठार झाले. यावेळी घरातील महिला आणि मुलांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारच्या ग्रामस्थांनी याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन संशयित हल्लेखोर नितीन वसंत इंगवले-देशमुख याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

SCROLL FOR NEXT