crime cases in sangli one gram panchayat members dead in accident 
पश्चिम महाराष्ट्र

उपसरपंच निवडी दरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी ; सदस्याचा मृत्यू

शमु मुल्ला

शिरोढण (सांगली) : बोरगांव (ता. कवठेमहांकाळ) येथे उपसरपंच निवडी दरम्यान दोन गटांत झालेल्या हणामारीत एका सदस्याचा मृत्यू झाला. पांडुरंग जनार्दन काळे (वय 58, रा. बोरगाव) असे मृत सदस्याचे नाव आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुमारे शंभरहुन अधिक लोकांच्या जमावात ही मारहाण झाली. यात तिघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. 

दरम्यान, मृत काळे हे भाजपचे सदस्य आहे. सदस्य फुटल्याच्या वादातून ही मारामारी झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. उपसरपंच नामदेव पाटील यांनी महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. तिथे उपसरपंच पद रिक्त होते. बोरगाव ग्रामपंचायतीत 12 सदस्य आहेत. सरपंच निवड थेट जनतेमधून करण्यात आली होती. त्यापैकी 2 राष्ट्रवादीचे आणि 9 भाजपचे सदस्य होते. सरपंच हे माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक गटाचे होते. भाजपचे नामदेव पाटील यांनी उपसरपंच पदाचा महिन्यापूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर आज उपसरपंच निवडीसाठी दोन गट ग्रामपंचायत समोर आमने सामने आले. त्यावेळी दोन्ही गटात सदस्य फुटीवरून काठीने जोरदार हणामारी झाली. यावेळी पांडुरंग काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीन जखमी झाले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT