crime gang of belgaum arrested police but two person drown and dead 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिसांना चकवा द्यायला गेले अन् जीवाला मुकले

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : पोलिसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात मलप्रभा नदीत उडी घेतल्याने दोन जुगाऱ्यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. ७) सायंकाळी रामदुर्गमध्ये ही घटना घडली. अग्निशामक दलाचे जवान व पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. समीर अहंमदसाब बटकुर्की (वय २२, रा. रामदुर्ग) व मंजुनाथ लक्ष्मण बंडीवड्डर (२८, रा. किल्ला तोरगल) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रामदुर्गजवळील पडकोट क्रॉसनजिकच्या हिंदू स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात जुगार रंगला होता. याची माहिती मिळताच रामदुर्ग पोलिसांनी सायंकाळी सहाच्या सुमारास सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याची तयारी केली. मात्र, जुगाऱ्यांनी अड्ड्यापासून काही अंतरावर आपल्या दोन खबऱ्यांना तैनात 
केले होते. 

पोलिसांची फौज जुगार अड्ड्याकडे येत असल्याचे पाहताच खबऱ्यांनी जुगाऱ्यांना इशारा मिळाला. त्यामुळे, अड्ड्यावर जमलेल्या ३० ते ३५ जुगाऱ्यांनी वाट फुटेल तिकडे धाव घेतली. त्यापैकी सहाजणांनी जवळच असलेल्या नदीपात्रात उड्या टाकल्या. चौघे पोहत सुखरुपपणे पलीकडे गेले. मात्र, दोघे अर्ध्यावरच नदीत बुडाले.

पोहून बाहेर पडलेल्या चौघांनी दोघे बुडाल्याची माहिती इतरांना दिली. पोलिसांनाही याबाबत समजले. त्यामुळे, रात्रीपासूनच पाण्यात बुडालेल्या दोघांचा शोध सुरु करण्यात आला. रामदुर्ग पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानानी मृतदेह बाहेर काढले. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी नदी पात्र ओलांडताना दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करुन घेतली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Crime : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा! नरबळी दिल्याचा आरोप; अकोल्याच्या युवकाची इंदूरमध्ये हत्या, मांत्रिकाच्या पूजेचे व्हिडिओ आले समोर

Glasses Cleaning Tips : तुम्हीही शर्ट किंवा टिश्यू पेपरने चष्मा पुसता का? वेळीच थांबा! ही एक चूक लेन्स कायमच्या खराब करू शकते; जाणून घ्या योग्य पद्धत

Corporators Protest : सभेची कार्यपत्रिका वेळेत नाही, प्रस्तावांचा तपशीलही गायब; पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण

Marathi News Live Updates : सावरकर मुद्द्यावरून महायुतीची दुटप्पी भूमिका; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप, "शिंदेसेना 'बंच ऑफ थॉट्स' आणि अरुण शौरींचे पुस्तक फाडणार का?" असा थेट सवाल

Pune Traffic : प्रयेजा सिटी परिसरातील भुयारी मार्गाच्या कामामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतुकीत गुरुवारपासून तात्पुरते बदल लागू

SCROLL FOR NEXT