crime news Inquiry of sale of government land suspension of officers belgaum Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : सरकारी जमीन विक्रीची चौकशी सुरु

अधिकाऱ्यांवर निलंबनाची शिफारस; ऱायबागला खासगी व्यक्तीच्या नावे जमीन

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : रायबागला सरकारी जमीनीची विक्री झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वरिष्ठ अधिकारीस्तरावर १ आठवड्यापासून चौकशी सुरु असून, संबंधीत अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. रायबागला मत्स्य विभागाची १ एकर २० गुंठे जमीन आहे. पैकी ६५ बाय ७० चौरस फूट जागा बनावट कागदपत्रे तयार करून चव्हाण नावाच्या व्यक्तीच्या नावे हस्तांतरित केली आहेत. यानंतर चव्हाण यांनी सदर जमीन चौघांना विकली आहे. यामुळे खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांच्या रडावर रायबाग मुख्य कार्यकारी अधिकारी, बिल कलेक्टर आणि नोंदणी विभागातील कर्मचाऱ्याचा सहभाग आहे, अशी माहिती पुढे आली आहे.

यामुळे या प्ररकरणांत त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी झाली आहे. दाखल्यांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी जिल्हा नगरविकास अधिकारी ईश्‍वर उळागड्डी यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास खात्याला पत्र पाठविले आहे. त्यामुळे लवकरच कारवाई होण्याची व तिघांवर निलंबनाची शक्यता वर्तवली जात आहे.

माहिती हक्क कार्यकर्ते सुरेंद्र उगारे यांनी माहिती उघडकीस आणली आहे. प्रादेशिक आयुक्त, जिल्हा नगरविकास अधिकाऱ्यांकडे गेल्या २ वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. पण, त्याची सुरवातीला गंभीर दखल घेतली नाही. अलिकडे वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जात असून, कारवाईबाबत पत्रव्यवहार सुरु आहे. याबाबत ॲड. उगारे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ‘‘प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणे जरुरी आहे. सर्व व्यवहार पाठीमागे नेते, वरिष्ठ अधिकारी आहेत. यामुळे एसीबीकडे चौकशी सोपवली जावी.’’

‘‘रायबाग नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, बिल कलेक्टर, सहाय्यक अधिकाऱ्यांनी मिळून मत्स्य विभागाची सरकारी जमीनीची विक्री केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. यामुळे त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस आणि शासनाला अहवाल अहवाल पाठविला आहे.’’

- ईश्‍वर उळागड्डी जिल्हा नगरविकास अधिकारी

काय घडले आहे?

रायबागला बसस्थानकाजवळ (चित्रपटगृहाजवळ) १ एकर २० गुंठे जमीन मत्स विभागाची आहे. जमीनीची अधिकारी व निर्वाचीत सदस्यांनी मिळून परस्पर विक्री केल्याचे आढळून आले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रकरण घडले. पण, अलिकडे माहिती उघडकीस आली आहे. ज्या व्यक्तीच्या नावे जागा हस्तांतरीत केली होती. त्याने चौघांना जागा विक्री विकली आहे. सर्वांच्या विरोधात आता फौजदारी गुन्हे नोंदविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

अलिकडे केडीपी बैठक झाली. त्या बैठकीत विषय आला. पालकमंत्री गोविंद करजोळ यांनी रायबाग नगरपंचायत मुख्याधिकारीसह इतरांवर शिस्तभंग आणि फौजदारी गुन्ह्याबाबत निर्देश बजाविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT