अमर ऊर्फ गुट्ट्या राजेंद्र जाधव sakal
पश्चिम महाराष्ट्र

Crime news : दुचाकीवरून पाठलाग करून तरुणाचा खून, थरारक घटनेने सांगली हादरले

कुपवाड-बामणोली रस्त्यावर घटना; अज्ञातांचे कृत्य

सकाळ वृत्तसेवा

कुपवाड : बामणोली-कुपवाड रस्त्यावर रविवारी रात्री धारधार शस्त्राने अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला. अमर ऊर्फ गुट्ट्या राजेंद्र जाधव (वय २७, रा. सुवार्ता टॉकीज जवळ कुपवाड ता. मिरज) असे त्याचे नाव आहे. हल्लाप्रकरणी संशयितांविरोधात कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कुपवाड पोलिसांनी तत्काळ शोधपथके रवाना केली.

पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अमर जाधव यांचा कुपवाड शहरात चायनीजचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ते बामणोली रस्त्यावरून निघाले असता. हल्लेखोरांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. बामणोलीच्या कमानीजवळ धारधार शस्त्रांनी जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.

हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले. ते जमिनीवर कोसळताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी धाव घेतली. जखमी जाधव यांना आयुष हेल्पलाईन रेस्क्यू टीमच्या मदतीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बामणोली रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली. जमिनीवर जाधव यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १० डीम ४१२७) आणि एक धारधार हत्यार पोलिसांनी पंचनाम्यादरम्यान जप्त केले. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुपवाड ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आली.

मृत जाधव रेकॉर्डवरील गुन्हेगार

खुनातील मृत जाधव हद्दपार गुन्हेगार असल्याची माहिती कुपवाड पोलिसांनी दिली. त्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. रविवारी शहरात आल्यानंतर पूर्वी झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आला असा संशय व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

SCROLL FOR NEXT