crime news Stocks of drugs seized from group Vaddi Action of Pune Customs Department Sakal
पश्चिम महाराष्ट्र

वड्डीत एका ग्रुपकडून अंमली पदार्थाचा साठा हस्तगत

पुणे सीमा शुल्क विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मिरज : मिरज पुर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केल्याची समोर येत आहे. कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अधिक माहिती अशी, की मिरजेतील एका उद्योजकाच्या फार्म हाऊसवर सांगली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने पुणे विभागीय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने काल मध्यरात्री छापा टाकून अमली पदार्थांचा साठा जप्त केला. आज रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र हा साठा नेमका कोणाचा याची शहानिशा सुरु असल्याने याबाबत अद्याप कोणावर गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.

जप्त केलेल्या अंमली पदार्थाच्या साठ्याची लाखो रुपये किंमत असून केंद्रीय पथकाने अचानक छापा टाकून अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याने याबाबत शहरात दिवसभर चर्चा सुरू होती. ही संस्था एक भारतीय केंद्रीय कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या तरतुदींनुसार अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर पदार्थांच्या वापराशी लढा देण्याचे काम एजन्सीकडे आहे. त्यानुसार माहिती प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : 100 मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT