पश्चिम महाराष्ट्र

इचलकरंजी : विकास खंडेलवालसह सहा जणांवर खंडणीचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - यंत्रमाग कारखानदारासह दोघांचे अपहरण करून 50 हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी सहा जणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. विकास रामअवतार खंडेलवाल (वय 27, संग्राम चौक) व हर्षवर्धन शाहू घोरपडे (विक्रमनगर) यांना अटक केली.

दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी श्रीनाथ आदिनाथ लोले (गल्ली नंबर 3, गणेशनगर) यांनी तक्रार दिली. त्यांना तसेच त्यांचे दिवाणजी संजय सिंघवी यांना मारहाण करून अंगठी लंपास केली आहे. मॅडी उर्फ मंदार घोरपडे, अरुण कोळी व अन्य दोघे अनोळखी पसार झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार लोले व त्यांचे दिवाणजी सिंघवी जुना एसटी स्टॅन्ड परिसरात चहा पिण्यास थांबले होते. मोटारीतून आलेल्या चौघांनी लोले यांचे तेथून अपहरण केले. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सिंघवी यांचेही अपहरण केले. दोघांना अलायन्स हॉस्पिटल परिसरातील एका शेतात घेऊन गेले. 

दोघांनीही संशयितांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत 20 हजार रुपयांची सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. लोले यांनी आतेभावाला याबाबतचा मेसेज पाठविला. त्यानंतर सर्व नातेवाईक संबंधित ठिकाणी येवून 50 हजारांची खंडणी संशयितांना दिली. त्यानंतर दोघांना सोडून दिले. एकिकडे गणेश विसर्जन मिरवणूकीची धामधूम सुरु असतांना गुरुवारी दुपारच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. या प्रकरणी कुख्यात गुन्हेगार विकास खंडेलवाल व हर्षवर्धन घोरपडे यांना अटक केली. त्यांच्यावर नेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. 

"मोका" कारवाईचे संकेत 
खंडेलवाल व घोरपडे यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली पोलीस यंत्रणेकडून सुरु आहेत. याबाबतचे संकेत पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT