crime story police Solve the mysterious murder case in four days belgaum  sakal
पश्चिम महाराष्ट्र

आव्हानात्मक खून प्रकणाचा चार दिवसात छडा

अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासह मारेकऱ्यांना अटक

अमृत वेताळ

बेळगाव : खून करून अथणी येथील कालव्यात फेकून देण्यात आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासह मारेकऱ्यांना अवघ्या चार दिवसात गजाआड करण्यात पोलिसाना यश आले आहे. विठ्ठल तुकाराम बन्नेण्णवर (वय २१ सध्या रा. उगार बी.के. मुळ रा. गुगवाड रा. महाराष्ट्र) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी शुक्रवार (ता.२९) ऐगळी पोलिसानी एका अल्पवयीनासह दोघांना अटक केली आहे. अज्ञातानी २० ते २५ वयोगटातील एका तरूणाचा धारधार शस्त्राने निर्घुन खून केला. त्यानंतर साक्षी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह अथणी यंक्कची गावानजिकच्या कालव्यात मृतदेह फेकून देण्यात आला होता. रविवार (ता.२४) दुपारी १ च्या सुमारास बसाप्पा शंकर हुक्कुंडी (रा. यक्कुंडी ता. अथणी) हे या मार्गावरून मोटार सायकलवरून जात असताना सदर मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला.

ही माहिती पोलिसाना देण्यात आली. लागलीच ऐगळी पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहाच्या अंगावर ईस्सा कंपणीची अंडरवेअर होती. तर उजव्या हाताच्या तळव्यावर विठ्ठल नाव गोंदले होते. या व्यतरिक्त मृतदेहाबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती समजू शकली नव्हती. मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसासमोर होते. त्याचबरोबर त्याचा खून कोणी व कशासाठी केला असावा हे शोधणेही आव्हानात्मक होते. पोलिसानी या प्रकरणी अनोळखीचा खून प्रकरणी अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करुन त्याच दिवशीपासून तपासचक्रे गतीमान केली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.

बीट पोलिसाच्या माध्यमातून मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलिसाना अवघ्या चारच दिवसात मृतदेहाची ओळख पटविण्यास मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आले. या प्रकरणी पोलिसानी एका अल्पवयीनासह दोघांना अटक केली. वयक्तिक राग आणि पुर्ववैमनस्यातून हे खून प्रकरण घडल्याचे स्पष्ट झाले. खूनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. अथणीचे पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर, ऐगळीचे पोलिस उपनिरीक्षक एस. एच. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला. जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यानी पोलिसांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT