Crimes against sand thieves from Kumthe; Including two from Kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

कुमठेतून वाळू चोरणाऱ्यांवर गुन्हा; कोल्हापुरातील दोघांचा समावेश 

शैलेश पेटकर

सांगली : कुमठे (ता. तासगाव) येथील ओढ्यातून बेकायदा वाळूचा उपसा करून ती चोरून नेणाऱ्या ट्रकचालकास ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. तीन ब्रास वाळूसह डंपर असा दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी डंपर मालक बाबासो प्रकाश लुगडे (टोप संभापूर, ता. हातकणंगले, कोल्हापूर) आणि चालक अनिल सुरेश नाईक (वय 24, रा. शिवाजीनगर, शिये, ता. करवीर, कोल्हापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील पोलिस गस्तीवर होते.

त्यावेळी कुमठे फाटा येथून एक पंढऱ्या रंगाचा डंपर चोरीची वाळू घेवून कोल्हापूरला निघाल्याची माहिती पहाटे साडेचारच्या सुमारास पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ बुधगाव (ता. मिरज) येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ सापळा रचला. सकाळी सातच्या सुमारास पांढऱ्या रंगाचा डंपर (एमएच 09 एफएफ 4400) येताना दिसून आला. 

पोलिसांनी तो डंपर चौकशीसाठी थांबवला. त्यावेळी त्यात वाळू दिसून आली. डंपर चालक अनिल नाईक यास वाळूबाबत विचारणा केली असता डंपर मालक बाबासो लुगडे याच्या सांगण्यावरून वाळू घेवून येत असल्याचे सांगितले. परवानाबाबत विचारणा केली असता मिळून आला नाही. कुमठे येथील ओढ्यातून बेकायदापणे वाळू उपसा करून चोरून नेत असल्याचे समोर आले. त्यानुसार डंपर चालकास ताब्यात घेवून महाराष्ट्र गौण खनीज कायद्यांतर्गत डंपर मालक-चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

आठवड्यातील दुसरी कारवाई 
सांगली ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. या आठवड्यातील वाळू चोरीची दुसरी घटना समोर आली आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT