Crimes at Akole under the bandhgiri law 
पश्चिम महाराष्ट्र

येथे चालते बंदबिगारी, हे काय वेगळंच...

सकाळ वृत्तसेवा

अकोले ः किमान वेतनापेक्षा कमी मासिक वेतनावर 15-15 तास जबरदस्तीने काम करवून घेऊन आदिवासी कुटुंबाचे बंदबिगारी म्हणून शोषण केल्याच्या आरोपावरून अकोले पोलिस ठाण्यात दत्तात्रय सुखदेव गिते व सुखदेव शंकर गिते (रा. कोतूळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भारती किरण जाधव (मूळ रा. साकूर फाटा, ता. इगतपुरी, जि. नाशिक; हल्ली रा. कोतूळ, ता. अकोले) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आदिवासी अनुसूचित जमातीच्या दाम्पत्याला दत्तात्रय गिते व सुखदेव गिते यांनी दैनंदिन किमान वेतनापेक्षा कमी, म्हणजे 4500 ते 5000 रुपये मासिक वेतनावर मजूर बंदबिगारी म्हणून कामास ठेवले.

सुमारे 15-15 तास जबरदस्तीने आणि आजारी असतानाही काम करवून घेतले. त्यांनी काम सोडू नये म्हणून उचल देऊन त्यांच्याकडून अंगमेहनतीची कामे करवून घेतली.

उचल दिलेली रक्कम एक लाख 15 हजार रुपये दाखवून, बंदबिगारी म्हणून शोषण केले. अकोले पोलिसात बंदबिगार पद्धती अधिनियम 1976 चे कलम 16, 17, 18 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3 (1) (6) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT