crocodile came directly on the road 
पश्चिम महाराष्ट्र

मगर आली थेट रस्त्यावर... कुठे ते वाचा?

सकाळवृत्तसेवा

बिळाशी (जि. सांगली) : येथे रोकडे वस्तीनजीक लागून असणाऱ्या शिराळा-कोकरूड रोडवर गुरुवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान येथील नागरिक शकील मुलाणी यांना त्यांच्या गाडीच्या प्रकाशात रस्ता ओलांडताना मगर स्पष्टपणे दिसली होती.

या मगरीचा व्हिडिओ त्यांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. बिळाशीतील वारणा डावा पोटकालव्यातून ही मगर ओढ्याकाठांचा आसरा घेत बाहेर पडली असल्याचा अंदाज ग्रामस्थांतर्फे वर्तवला जात आहे. या मगरीचे दर्शन शेतकरी विलास आनंदा पाटील, भानुदास पाटील यांच्याही विहिरीत झाल्याचे ग्रामस्थांकरवी समजते आहे.

नागरिकांमधील भीतीदायक वातावरण कमी करण्यासाठी वनविभागाने तत्काळ मगरीचा वावर असलेल्या परिसराचा माग घेत, त्या परिसरात तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. वन विभाग वरिष्ठांचेही लक्ष असल्याची माहिती वनरक्षक प्रकाश पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना दिली आहे. मांगरुळ येथील बोगद्यानजीकही ग्रामस्थांना पंधरा दिवसांपूर्वी मगरीचे दर्शन झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT