The crocodile in the pond at Yedemchhindra 
पश्चिम महाराष्ट्र

तळ्यात आलीय मगर; अन गाव भीतीच्या छायेत...

सकाळवृत्तसेवा

किल्लेमच्छिंद्रगड : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा, जि. सांगली ) गावच्या श्री गोरक्षनाथ मंदिर येथील पोखरणीच्या तळ्यामध्ये एक मगर मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून वावरत आहे. या मगरीच्या दहशतीने तळ्याच्या बाजूला शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यामध्ये तसेच गोरक्षनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

येडेमच्छिंद्र ते भवानीनगर हा महत्वाचा रहदारीचा रस्ता याच तळ्यात जवळून जातो. तळ्यात मगरीचे वास्तव्य असल्याने रस्त्याने जाणारे प्रवासी, मंदिरात जाणारे भक्त आणि शेतात जाणारे शेतकरी यांच्यात भीती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी वनविभागाकडून या मगरीस पकडण्याचा असफल प्रयत्न झाला होता.

परंतु त्यानंतर मगरीस पकडण्याबाबत कोणतेच ठोस प्रयत्न झालेले नाहीत. पावसाळा सुरू झाल्यानंतर तलावातील पाण्याचे प्रमाण वाढल्यास, मगर पकडणं अवघड होणार असल्याने वनविभागाने मगर पकडण्याबाबत तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान यांनी केली आहे.

गावातील विकास चव्हाण आणि हर्षद जगताप या दोन तरुणांनी मगरीचा एक व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने परिसरात भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT