Crop damage in 877 hectares due to heavy rain; Panchnama completed in Kadegaon taluka 
पश्चिम महाराष्ट्र

877 हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान; कडेगाव तालुक्‍यात पंचनामे पूर्ण

संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली ) : मुसळधार अवकाळी पावसाने तालुक्‍यातील 877 हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.कृषी, महसुल व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथील नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे पुर्ण केले आहेत.तर नुकसानीपोटी मिळणारी भरपाईची रक्कम 93 लाख रुपये इतकी असून ती लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

तालुक्‍याला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे तालुक्‍यातील आले, केळी, भाजीपाला, सोयाबीन, कलिंगड, हळद, द्राक्षे आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दिवसरात्र काबाडकष्ट करुन व बॅंका, सोसायटीची कर्जे काढून पिके पिकवली. परंतु पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने, त्यांच्यावर आता कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. 

शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसुल, कृषी व ग्रामविकास विभागाला शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कृषी महसूल व ग्रामविकास विभागाच्यावतीने तालुक्‍यातील 55 गावातील 877 हेक्‍टर क्षेत्रांतील नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत.

त्यामध्ये आले, केळी, भाजीपाला, सोयाबीन, कलिंगड, हळद, द्राक्षे आदी 32 शेतीपिकांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. तर तालुक्‍यातील नुकसान झालेल्या शेती पिकांची लोकप्रतिनिधीसहित प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका कृषी अधिकारी बी. जी. कदम आदींनी पाहणी केली होती. आता पंचनामे पुर्ण झाले असून, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी आता सर्व स्थरातून जोर धरु लागली आहे. 

अहवाल शासनाला सादर

तालुक्‍यात पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 55 गावांतील 877 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाच्या निकषानुसार 93 लाख इतकी भरपाईची रक्कम होत आहे. याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला आहे. 
- बी. जी. कदम, तालुका कृषी अधिकारी, कडेगाव 

संपादक : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT