Crop Insurance Scheme For Rabi Crop Sakal Impact 
पश्चिम महाराष्ट्र

रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू करण्यात कृषी विभागाला यश आले. नैसर्गिक आपत्तीमुळे खासगी पीकविमा कंपन्यांनी रब्बी हंगामातून पळ काढला होता. पाच वेळा निविदा काढूनही एकाही कंपनीने निविदा भरली नव्हती. ‘सकाळ’मध्ये याबाबत बातमी प्रसिद्ध होताच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली. राज्यसभेतही प्रश्‍न उपस्थित करून पीकविमा कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे विमा कंपन्यांनी अखेर निविदा भरली. दहा जिल्हे वगळून गुरुवारी (ता. २८) याबाबतचा शासकीय अध्यादेश निघाल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि अवकाळीने शेतीचे मोठे नुकसान केले. ऑक्‍टोबरअखेर पाऊस सुरू राहिल्याने शेतकऱ्यांना मोठी भरपाई द्यावी लागेल, त्यामुळे कंपन्यांनी रब्बी हंगामातून पळ काढला होता. हंगाम सुरू होण्यापूर्वी पीक विम्याबाबतच्या निविदा प्रसिद्ध होतात. संबंधित कंपन्या निविदा भरतात. हंगामापूर्वी साधारण तीन महिने आधी याबाबतची प्रक्रिया पूर्ण होते; मात्र या वेळी रब्बी हंगाम सुरू होऊनही निविदेसाठी एकही कंपनी पुढे येत नव्हती. खरिपातील भरपाई देण्यासही संबंधित कंपन्यांकडून टाळाटाळ होत आहे.

पळ काढणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कारवाईची मागणी

याबाबत ‘सकाळ’ने ८ नोव्हेंबरच्या अंकात पीक विमाच्या प्रश्‍नावर व कंपन्यांच्या नफेखोरीवर आकडेवारीसह वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तातडीने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेत विमा कंपन्यांच्या नफेखोरीवर लक्ष वेधले, तर रब्बी हंगामातून पळ काढणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. त्यावर तोमर यांनी कारवाईचा इशारा दिला. पीक विमाप्रश्‍नी राज्यसभेतही खासदार संभाजीराजे यांनी सभागृहाचे लक्ष वेधत या कंपन्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली होती. 

हे जिल्हे अद्याप बाकी

सोलापूर, लातूर, हिंगोली, वाशीम, भंडारा, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर या दहा जिल्ह्यांसाठी कंपन्यांनी निविदा न भरल्याने या जिल्ह्यांसाठी पीकविमा योजना लागू करण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शासकीय अध्यादेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT