crops on 36 thousand 344 hector have lost in solapur district due to heavy rain
crops on 36 thousand 344 hector have lost in solapur district due to heavy rain 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यातील 36 हजार 344 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान 

प्रमोद बोडके

सोलापूर : ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील 302 गावांमधील 36 हजार 344 हेक्‍टरला बसला आहे. या पावसामुळे 49 हजार 618 शेतकरी बाधित झाले असल्याची माहिती कृषी व महसूल विभागाच्या पाहणीतून समोर आली आहे. नजर अंदाज अहवालावरून ही माहिती समोर आली असून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

ऑक्‍टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात सरासरी 70.91 मिलिमीटर पाऊस होतो. आज अखेरपर्यंत जिल्ह्यात यंदाच्या ऑक्‍टोबरमध्ये 180 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या 254 टक्के पाऊस झाल्याने काढणीसाठी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बार्शी तालुक्‍यातील 27 हजार 439 हेक्‍टरचे नुकसान झाले असून यामध्ये सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यापाठोपाठ दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील चार हजार 651 हेक्‍टर, मोहोळ तालुक्‍यातील दोन हजार 484 हेक्‍टर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एक हजार 335 हेक्‍टर, माढा तालुक्‍यातील 195 हेक्‍टर व अक्कलकोट तालुक्‍यातील 237 हेक्‍टरचा समावेश आहे. या अवकाळी पावसाचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कांदा, द्राक्ष, डाळिंब, तूर, भुईमूग, सूर्यफूल या पिकांना बसला आहे. 31 हजार 312 हेक्‍टरवरील सोयाबीन, एक हजार 566 हेक्‍टरवरील कांदा, 318 हेक्‍टरवरील भाजीपाला, 210 हेक्‍टरवरील भुईमूग, दोन हजार 592 हेक्‍टरवरील तूर या अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे. 

नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एकूण नुकसानीची आकडेवारी, नुकसानग्रस्त क्षेत्र, बाधित शेतकऱ्यांची संख्या ही माहिती समोर येणार आहे. 
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT