A crowd of one lakh devotees at Triveneshwar 
पश्चिम महाराष्ट्र

Mahashivratri 2020 : त्रिवेणीश्वरला एक लाख भाविकांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा

सोनई : महाशिवरात्रीनिमित्त नेवासे तालुक्‍यातील हंडीनिमगाव येथील त्रिवेणीश्वर मंदिरात दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर फराळाचे अन्नदान सुरू होते. 
त्रिवेणीश्वरला आज पहाटे पंचामृत अभिषेक, महापूजा व आरती सोहळा झाला. सकाळी दर्शनासाठी सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. दर्शनरांगेत हर हर महादेव...चा जयघोष सुरू होता. सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान कान्होपात्रा महाराजांचे कीर्तन झाले.

 
त्रिवेणीश्वर मंदिरासमोर भरलेल्या यात्रेत परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. औरंगाबाद, नगर व नाशिक येथील भाविकांनी साबुदाणा खिचडीचे वाटप केले. सायंकाळी महंत मुक्तानंदगिरी महाराज वेल्हाळे यांची शिवचरित्र कथा झाली. पुरोहित राजूदेवा जोशी यांच्या मंत्रघोषात पूजा झाली.

त्रिवेणीश्वर भक्त मंडळाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता, दर्शनव्यवस्था, पिण्याचे पाणी व प्रसादवाटपाची सेवा दिली. 
सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. उद्या (शनिवारी) सकाळी दहाला महंत मुक्तानंदगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT