Crying by Minister Hasan Mushrif.gif 
पश्चिम महाराष्ट्र

...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ 

सकाळ वृत्तसेवा

कागल. : टोप (ता. हातकणंगले) येथील मिरजकर कुटुंबीयांनी दिलेली फ्रेम पाहताच मंत्री हसन मुश्रीफ यांना गहिवरून आले आणि त्यानंतर त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. सद्गदित झालेले मुश्रीफ नकळत म्हणाले, आज हा क्षण पाहायला माझी आई हवी होती. 

रविवारी सकाळी दहाची वेळ. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोरचा भव्य शामियाना. मुश्रीफ यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मंडप खचाखच भरलेला होता. पुष्पगुच्छ, फुले आणि हारतुरे स्वीकारताच मुश्रीफ येणाऱ्या प्रत्येकाला चहा घेऊन जाण्याचे आवाहन करीत होते. त्यातच टोप येथील मिरजकर कुटुंबीय मुश्रीफ यांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते. नंदकुमार बाळासो मिरजकर यांच्या सोबत पत्नी अनिता, मुलगा आर्यन व मुलगी राजनंदिनी यांनी मुश्रीफ यांना दिवंगत आई श्रीमती सकीनाबी आणि दिवंगत वडील मियालाल यांचे फोटो असलेली मोठी फ्रेम भेट म्हणून दिली. फ्रेमवर तळात अक्षरे होती , "मी हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ, ..." ही फ्रेम पाहताच मंत्री मुश्रीफ यांना गहिवरून आले आणि त्यानंतर त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. सद्गदित झालेले मुश्रीफ नकळत म्हणाले, आज हा क्षण पाहायला माझी आई हवी होती.
यावेळी सहा वर्षांची चिमुकली राजनंदिनी मिरजकर म्हणाली, गेल्यावर्षी साहेबांच्या आईचे निधन झाले. आपल्या मुलाचे हे उत्तुंग यश बघण्यासाठी आज जर ती माऊली असती तर तिला अजूनही मोठा आनंद झाला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT