Cybercrime.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

खोटे संदेश "व्हायरल' केल्यास सायबर क्राईमकडे गुन्हा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- जिल्हाधिकारी सांगली व जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या नावाने खोटे व बनावट संदेश तयार करून ते सोशल मीडियावर "व्हायरल' केल्याप्रकरणी सांगली सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गेले काही दिवस "व्हॉट्‌स अप' आणि फेसबुक तसेच इतर सोशल मिडियावर जिल्हाधिकारी सांगली व जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या नावाने बोगस संदेश फिरत आहेत. चुकीची माहिती देणारे हे आवाहन करणारे संदेश व्हायरल होत आहेत. "चिकन मटण घेणे बंद करा', "वृत्तपत्रे घरात घेऊ नका' असे चुकीचे व खोटे आवाहन करण्यात येत आहे. अशा प्रकारचे कोणतेही आव्हान जिल्हाधिकारी अथवा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे नागरिकांनी असे शासकीय अधिकारी व कार्यालयाच्या नावाने असणारे संदेश, आवाहन कोणतीही खात्री न करता पुढे पाठवू नयेत. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधावा. अशा खोट्या अफवा पसरणे, खोटी माहिती पसरवणे हा गुन्हा असून सायबर क्राईम पोलीस अशा घटनांवर लक्ष ठेवून आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे. तरी कोणीही ही नागरिक व वाचक यांनी अशा खोट्या प्रचाराला बळी पडून घाईने काहीही निर्णय घेऊ नयेत असे आवाहन करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT