cycle-rally
cycle-rally 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढ्याच 'एक वारी सायकल रॅली' उपक्रम

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील ओझेवाडी, राझंणी, गोपाळपूर या  गावात फेसबुक, व्हॉटसअॅप वरील अफवावंर ठेऊ नका विश्वास, निष्पाप लोंकाना देऊ नका त्रास, प्लॅस्टीक हटवा देश नटवा, गर्भात करू नका मुलीचा खून भविष्यात मिळणार नाही तुम्हाला सून, दारू डोसाल फोटोत दिसाल, सायकल चालवा इंधन वाचवा, सायकल चालवा पर्यावरण वाचवा असे संदेश देणारी पत्रके वाटून गावागावात जनजागृती व प्रबोधन करण्यात आले.  

या रॅलीचे उदघाटन डिवायएसपी युनुस आत्तार, नगराध्यक्षा अरूणा माळी, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, नगरसेविका अनिता नागणे, डॉ प्रिती शिर्के, डॉ शरद शिर्के आदी मान्यवरांच्या हस्ते संत दामाजी पंताच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व सायकलीचे पूजन करून करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रगीत घेण्यात आले. यावेळी डिवायएसपी युनुस आत्तार व अरूणा माळी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. वारकरी साप्रंदयाची भगवी पताका दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. दामाजी मंदिरापासून निघालेल्या या रॅलीतील प्रत्येक सायकलवर लावलेले पर्यावरण रक्षण, मुली वाचवा, वाहतूक सुरक्षा, सायकलीचे महत्व, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, वीज बचत, स्वच्छता, पाणी हे जीवन, वृक्ष लागवड व संवर्धन, भ्रष्टाचार मुक्ती, रक्तदान श्रेष्ठदान अशा विविध विषयावरील सामाजिक संदेश देणारे बोर्ड सर्वांचे विशेष म्हणजे अनुजा तारे, रूपाली कलुबर्मे, आकांक्षा हजारे, संध्याराणी माळी आदी महिलांनी सहभाग नोंदविला. 

संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्री विठ्ठलाच्या मंदीरास प्रदक्षिणा घालून संत तनपुरे महाराज मठामध्ये समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी पुणे विभागाचे शिक्षक आ.दत्तात्रय सावंत, डीवायएसपी युनुस आत्तार, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, एपीआय नाना कदम, धनश्री मल्टीस्टेटचे सुर्यवंशी साहेब, आदी मान्यवरांच्या हस्ते सहभागी 100 सायकल स्वारांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ अशोक सुरवसे व रूपाली कलुबर्मे यांनी रॅलीमधील आलेले अनुभव सांगितले तर आ. दत्तात्रय सावंत, युनुस आतार, साधनाताई भोसले, नाना कदम यांनी मनोगत व्यक्त करून वारी वरिवाराच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा विनायक कलुबर्मे यांनी मानले रॅलीसाठी मंगळवेढा पोलीस स्टेशन, संजीवनी हॉस्पीटल, पुजा ऑप्टीकल्स, ओम ट्रेडर्स, सिद्धनाथ ज्वेलर्स, धनश्री परिवार, तनपुरे मठ संस्थान, दामाजी एक्सप्रेस, डॉ शरद शिर्के, नगरसेवीका अनिता नागणे, नितिन नागणे, युवराज वाकडे, विद्यासागर देशमाने, बशीरभाई बागवान यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT