पश्चिम महाराष्ट्र

इंधन दर वाढीविरोधात पंचायत समिती सदस्य वापरतोय सायकल

गणेश जाधव

दिघंची - सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने देशातील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनतेची आर्थिक घडी विस्कटली आहे. पेट्रोल वाहनाला फाटा देत व मोदी सरकारचा निषेध व्यक्त करीत दिघंची येथील राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य कल्लापा कुटे यांनी चक्क सायकलवरून प्रवास सुरु केला आहे.

वारकरी असणारे कुटे यांना गावात नाना म्हणून ओळखले जाते. नाना हे अत्यंत शांत व संयमी स्वभावाचे असुन गावातील हरीनाम सप्ताह असो, पंढरपूर दिंडी सोहळा, भजन ,कीर्तन अशा सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग मोठा असतो.

सगळीकडे इंधन वाढीच्या व मोदी सरकाच्या विरोधात आंदोलन, मोर्चे काढण्यात आले मात्र डिझेल व पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत तर ते उलट वाढतच चालले आहेत. यावर उपाय म्हणून व सरकारचा निषेध म्हणून कुटे यांनी स्वतः च सायकलचा वापर सुरू केला आहे .गावामधून व मळ्यात इतरत्र सगळीकडे ते सायकलचा वापर करत आहेत. सध्या गावामध्ये नानांच्या सायकलची चर्चा सुरु आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT