सायकलपट्टूने पुनित राजकुमार यांना अनोख्या पद्धतीने वाहिली श्रध्दांजली  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सायकलपट्टूने पुनित राजकुमार यांना अनोख्या पद्धतीने वाहिली श्रध्दांजली

साडेदहा तास चालविली सायकल; रमेश पुजारी यांचे कौतूक

आनंद शिंदे

बेळगाव (संकेश्वर) : नेते आणि अभिनेत्यांचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असतो. त्यांच्या प्रत्येक बाबीचे अनुकरण अनेक लोक करत असतात. त्यामुळे त्यांची एक वेगळी क्रेझ तयार होते. त्याचा प्रत्येय आपणास अनेकदा येतो. संकेश्वर येथेही याचा दाखला सोमवारी (ता. २९) मिळाला. रमेश पुजारी या सायकलपट्टूने सकाळी ६.३० ते सायंकाळी ५ या वेळेत तब्बल साडेदहा तास सायकल चालवून दिवंगत अभिनेते पुनित राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी यापूर्वी सायकल चालविल्याचे अनेक विक्रम करून उपक्रम राबविले आहेत. पण आपल्या आवडत्या अभिनेत्याला सायकल चालवून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिल्याने त्यांचे शहरासह परिसरात कौतूक होत आहे.

रमेश पुजारी यांनी सकाळी 6.30 पासून सायकल चालविण्यास प्रारंभ केला. ते सायंकाळी 5 वाजता गांधी चौकात सायकलीवरून उतरले. यावेळी अभिनेते पुनित राजकुमार यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. सायकलपट्टू रमेश पुजारी म्हणाले, चित्रपट अभिनेते पुनित राजकुमार यांनी आपल्या अभिनय क्षेत्रात राहून समाजासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेल्या कार्यातून, विचारातून कायम जिवंत राहणार आहेत. त्यांना आपण कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी धनगर समाजाचे राज्य उपाध्यक्ष शंकर हेगडे, पैलवान अप्पासाहेब कर्दन्नावर, माजी नगरसेवक दीपक भिसे, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, डॉ. गिरीश कुलकर्णी, कुमार गुडशी यांनी पुजारी यांचा सत्कार केला. पुष्पराज माने यांनी स्वागत केले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson : भाई, दो सेंच्युरी मिस नाही झाल्या... ९७ अन् ८९ धावा केल्यात; संजू सॅमसनची भन्नाट पत्रकार परिषद Video Viral

'ही काय कोंबडीची पिसं...' 'येसूबाई' फेम प्राजक्ता गायकवाड नव्या हेअरस्टाइलमुळे ट्रोल; भावाने घेतली बहिणीची बाजू

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार

IIT Hyderabad Internship: B.Tech–M.Tech करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! IIT हैदराबादमध्ये SURE इंटर्नशिपसाठी अर्ज सुरू; महिन्याला स्टायपेंडही मिळणार; अशी आहे प्रक्रिया

Iran Missile Strike: इराणने थेट अमेरिकेचा डोळा भेदला! अब्जावधींची क्षेपणास्त्र चेतावणी प्रणाली उद्ध्वस्त, युद्धाला धोकादायक वळण

SCROLL FOR NEXT