Dadar-Pandharpur Express esakal
पश्चिम महाराष्ट्र

Central Railway : दादर-पंढरपूर एक्स्प्रेसचा मिरजमार्गे साताऱ्यापर्यंत विस्तार; 'या' जिल्ह्यांना पंढरपूरसाठी नवी गाडी

मिरज-पंढरपूर मार्गावरील (Miraj-Pandharpur Route) रेल्वे (Dadar-Pandharpur Express) प्रवासी मुंबईशी जोडले जाणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ही गाडी सातारा येथून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे.

मिरज : सातारा, कऱ्हाड, सांगली आणि मिरज येथील विठ्ठल भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) दादर-पंढरपूर गाडीचा व्हाया मिरजमार्गे सातारापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सातारा, सांगली आणि मिरजकरांना मुंबई आणि पंढरपूरसाठी थेट साताऱ्यातून नवी गाडी उपलब्ध झाली आहे.

शिवाय मिरज-पंढरपूर मार्गावरील (Miraj-Pandharpur Route) कवठेमहांकाळ-ढालगाव, जत रोड, सांगोला या प्रमुख तालुक्यातील रेल्वे (Dadar-Pandharpur Express) प्रवासी मुंबईशी जोडले जाणार आहेत. ही गाडी सातारा येथून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून पंढरपूर येथे रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. मुंबई येथील दादर येथे सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.

या गाडीस सातारा, कोरेगाव, मसूर, कऱ्हाड, ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, केम, जेऊर, भिगवण, दौंड, केडगाव, उरुळी, पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादर हे थांबे आहेत. यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मिरज रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे, सुकुमार पाटील, सोलापूर रेल्वे संघटनेचे संजय पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival 2025 : केज पोलिसांची डीजे विरोधात कारवाई; गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा आग्रह

"आठ महिने तिने आम्हाला भेटणं टाळलं" प्रिया मराठेच्या अखेरच्या दिवसांबद्दल मैत्रीण झाली व्यक्त; म्हणाली..

Ganpati Visarjan 2025 Live Updates : .लासलगावला अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन

९० वर्षांची परंपरा आजही कायम! बैलगाडीतून निघालेली गणपती मिरवणूक ठरली खास, भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठावरील ट्रान्सफॉर्म फोडून कॉपरची दहा लाखाची चोरी

SCROLL FOR NEXT