mumbai pune
mumbai pune 
पश्चिम महाराष्ट्र

रोज मटण-दारूची पार्टी...साहेब, या मुंबई-पु्ण्यावाल्यांना आवारा... गाववाले घाबरलेत

मार्तंड बुचुडे

पारनेर ः तालुक्यात सुमारे 50 हजाराहून अधिक लोक मुळचे पण मुंबई-पुणे व इतर ठिकाणी स्थायिक झालेले लोक आले आहेत. ते घरात न बसता दररोज गावभर फिरत आहेत. त्यामुळे बहुतांशी लोकं क्वॉरंटाईन आहेत. तरीही ते घरात बसत नाही. ते केवळ फिरतच नाही तर ओल्या पार्ट्या करीत फिरत आहेत. त्यांच्या मुक्तसंचारामुळे गावकरी मात्र धास्तावले आहेत.

बहुतेकजण शेतात एकत्र बसून पार्टी करणे, पत्ते कुटणे, किंवा नाहीच काही तर गप्पा ठोकण्यासाठी मोठ्या  संखेने जमा होतात. त्यांना पोलिस तरी किती आवरणार आणि पाळत तरी कुठे कुठे ठेवणार. म्हणून त्यांचे फावते आहे.

कोरोना व्हयरसच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यातही लॉकडाऊन झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरात मुंबई पुणे व इतरत्र नोकरी निमित्ताने असेले बहुतेकांनी लॉकडाऊनमुळे आपल्या गावी कुटुंबासह पळ काढला आहे. यातील काही लोक संचारबंदी लागू होण्यापूर्वीच तर काही संचारबंदी लागू झाल्यानंतर आलेत.

नेहमी कामाची व धावपळीची सवय असलेल्या या नोकरदारांना आता घरात बसून करमत नाही. तसेच ही नोकरदार मंडळी असल्याने यांच्याकडे दोन पैसेही जास्तीचे आहेत. कोणत्या ना कोणत्या मार्गाने अव्वाच्या सव्वा पैसे देऊन दारू मिळवित. किंवा गावातील मित्र मंडळी हाताशी धरून व त्यालाही आपल्यात सामील करून शेतात बेत करीत आहेत.

तेथेच पत्ते खेळतात. अर्थात पैशावर रमी खेळतात. अनेक गावात पारावर किंवा एखाद्या वाड्यातही करमणुकीच्या नांवाखाली पत्ते खेळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही नोकरदार कर्ती मंडळी त्यामुळे त्यांना कोण कसे समजावणार, हा खरा प्रश्न आहे.

या मुंबई-पुणेकरांचे एकत्र येणे आपल्या जीवावर येते की काय अशी शंका मुळच्या गावकरी मंडळींच्या मनात येऊ लागल्या आहेत.  साहेब किती तरी करा पण या मुंबईकरांना आवरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मुंबई से आया मेरा दोस्त...

या पूर्वी ज्या मुंबईकरांना गावाकडची मंडळी गावी आल्यानंतर आदर सत्कार करायची. त्यांच्या मागे-पुढे फिरायची. पण गावाकडची दोस्त मंडळी त्यांना टाळू लागली आहे. आता तर त्यांनी भीतीच घेतली आहे. त्याची भेट होणारच नाही तो आपल्या घरी येणारच नाही याची दखल घेतली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT