dairy business milk private lending business fraud with farmer sangli crime marathi news esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : दुध व्यवसायात छुप्या मार्गाने सावकारी करून शेतकऱ्यांची लुट

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्ती विरोधात शासन स्तरावरून कारवाई करण्याची मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून होवू लागली

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) : एकीकडे दूधाचे दर कमी झाले असताना वाळवा तालुक्यातील उत्तर भागात फिरून दूध गोळा करणारे गवळी पाच पॉइंट ते एक फॅट कमी करून शेतकऱ्यांना शासन नियमापेक्षा एक रुपया जादा दर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत आहेत.

तर बाजारात सरकीचा दरम्यान १२७० रुपये असताना १३८० रुपये विक्री करून पोत्यामागे ११० रुपये जादा तर गोळी पेंडीचा विक्री दर १४५० रुपये असाताना १७५० रुपये विक्री करून ३०० रुपये जादा वसूल करीत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्ती विरोधात शासन स्तरावरून कारवाई करण्याची मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून होवू लागली आहे.

मार्च ते सप्टेंबर अखेरचा काळ दुध व्यवसायाचा कृषकाळ समजला जातो. या काळात दुध संकलन घटून चाळीस टक्क्यावर येते. दुध संकलनात याकाळात स्पर्धा वाढीस लागलेली असते.

गेल्या तीन महिन्यांत गाईच्या दुधाचे दर तीन रुपयांनी कमी झाले असताना शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच फॅटमारी करून जादा दराचे आमिष दाखवले जात आहे. तर पशुखाद्यात मोठ्या प्रमाणात लुट सुरू आहे.

गायीच्या दुधास संकलन म्हणून नव्वद पैसे तर म्हैशीच्या दुधास एक रुपया संकलन दुध संघाकडून दिले जाते. मग दुध संकलन करणारे गवळी मिळणाऱ्या संकलनाच्या रकमेतून नोकर पगार, वाहतूक खर्च भागवून एक रुपया जादा दर देणार कसे? याचाच अर्थ फॅटमारी करून शेतकऱ्यांची बोटे शेतकऱ्यांच्या डोळ्यात घालून लुटमारी करण्याचा उद्योग सुरू असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT