Damage or robbery by machine? Study group appointed, but... 
पश्चिम महाराष्ट्र

यंत्राव्दारे ऊसतोड नुकसान की लूट? अभ्यासगट नियुक्त, पण...

विष्णू मोहिते

सांगली : यंत्राव्दारे होणाऱ्या ऊसतोडीमुळे होत असलेल्या नुकसानीचा अभ्यास करण्यासाठी साखर आयुक्तांनी 14 सदस्यांचा अभ्यास गटाची स्थापना केली आहे. या गटाने एक महिन्यात अहवाल सादर करावयाचा आहे. चौदा सदस्यांमध्ये 11 सदस्य कारखानदारांशी सबंधित आहेत. 

ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार तोडणी यंत्राव्दारे तुटलेल्या ऊसाचे वजन करताना एक टक्का वजावट करता येते. पण राज्यातील बहुतांश कारखान्याकडून ही वजावट पाच टक्के केली जात होती. साखर आयुक्त कार्यालयाने 27 जानेवारी 2021 रोजी वसंतदादा शुगरकडे वजावट प्रमाणाबाबत अहवाल मागवला होता. त्यांच्या अहवालानंतर पाडेगाव मध्यवर्ती येथील ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. 

साखर कारखाने मशिनने ऊस तोडणीत प्रतिटन 5 टक्के म्हणजे 50 किलो मोळी बांधणी वजावट करत असून, त्याला काही संघटनाचा विरोध आहे. त्याविरोधी आंदोलने होताहेत. ऊस नियंत्रण आदेशानुसार 1 टक्का म्हणजे प्रति टनामागे 10 किलो वजावट करणे अपेक्षित आहे. मात्र 1966 साली ऊस मशीनने तोडण्याची व्यवस्था नव्हती. तसा विचारही कोणी केला नव्हता. आता मशीनने ऊस तोडणी अपरिहार्य झाली आहे. 

याबाबत काही संघटनांचा असा मतप्रवाह आहे की, राज्यात 25 ते 30 टक्के म्हणजेच 2 कोटी 50 लाख टन ऊस मशीनने तोडला जाणार आहे व त्याच्या 5 टक्के बांधणी वजावट केली तर 12 लाख 50 हजार टन वजन वजा होते. यामध्ये पूर्वीप्रमाणे 1 टक्के वजावटच्या तुलनेत 4 टक्के जास्त वजावट केली जाते. त्याची म्हणजे 10 लाख टन ऊसाची किंमत 2500 रुपय टन दराने 250 कोटी रुपये होते. ही शेतकऱ्यांची लूट आहे. त्याऐवजी मशीनने तोडलेल्या ऊसाला त्याप्रमाणात कमी दर द्यावा. कारखाने सरासरी रिकव्हरीप्रमाणे दर देत असल्याने पालापाचोळा वजनाने कारखान्यांचे कोणतेही नुकसान होत नसल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. 

राज्यात लूट होते हे खरे नाही

मशीनने ऊस तोडल्यावर बांधणी मटेरिअल ऐवजी पालापाचोळा सदरात जी वजावट करताहेत ती निव्वळ पाल्याची नसून ऊसाच्या शेंड्याकडील वाढे, पाला ऊसाबरोबर ट्रॉलीत पडतो त्याचे वजन किमान 145 ते 155 ग्रॅम असते. सरासरी 150 ग्रॅम धरले व एक हजार ऊसाचा एक टन झाला तर 150 किलो वजन गणग्याचे होते. तसेच 750 ऊसांचा टन झाल्यास 112 किलो तर 500 ऊसांचा टन झाल्यास गणग्याचे 75 किलो वजन होते. त्यामुळे राज्यात अमुक कोटी रुपयांनी लूट होते हे खरे नाही. 
- संजय कोले, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT