Danger is increasing in Sangli Municipality area; 20 new patients in the district, three deaths 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली पालिका क्षेत्रात धोका वाढतोय; जिल्ह्यात नवे 20 रुग्ण, तिघांचा मृत्यू

शैलेश पेटकर

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 20 जणांना कोरोनाची बाधा झाली. पालिका क्षेत्रात धोका वाढतो असून आज दिवसांत सांगलीत सहा आणि मिरजेत पाच जण बाधित आढळून आले. दिवसभरात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कडेगाव, खानापूर आणि महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 321 रुग्ण उपचार आहेत. 

आज दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत 429 जणांचे स्वॅब तपासले. त्यात 5 जण कोरोना बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 276 जणांचे स्वॅब तपासले. त्यामध्ये 15 जण कोरोना बाधित आढळले. आटपाडी, जत आणि वाळवा तालुक्‍यात प्रत्येकी दोघांना बाधा झाली. तर खानापूर तालुक्‍यात तिघांना बाधा झाली.

कडेगाव, पलुस, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा तालुक्‍यात एकही रुग्ण आढळून आला नाही. महापालिका क्षेत्रातील सांगली शहरात सहा, तर मिरज शहरात पाच रुग्ण आढळून आले. तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अत्तापर्यंत 1769 जणांना मृत्यू झाला. 31 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 321 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 52 जण चिंताजनक आहेत. 213 रुग्ण गृहअलगीकरणात आहेत. 108 जण रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील चित्र 

  • आजअखेर जिल्ह्यातील रुग्ण- 48920 
  • आजअखेर बरे झालेले रुग्ण- 46830 
  • सध्या उपचार घेणारे रुग्ण- 321 
  • आजअखेर जिल्ह्यातील मृत्यू- 1769 
  • ग्रामीण भागातील रुग्ण- 24728 
  • शहरी भागातील रुग्ण- 7298 
  • महापालिका क्षेत्र रुग्ण- 16894 

कोरोना तालुकानिहाय स्थिती 

  • आटपाडी- 2565 
  • जत- 2374 
  • कडेगाव- 2981 
  • कवठे महांकाळ- 2496 
  • खानापूर- 3052 
  • मिरज- 4574 
  • पलूस- 2637 
  • शिराळा- 2302 
  • तासगाव- 3474 
  • वाळवा- 5571 
  • महापालिका- 16894 
  • एकूण - 48920 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT