Danger of staying on water literacy campaign paper 
पश्चिम महाराष्ट्र

जलसाक्षरता अभियान कागदावर राहण्याचा धोका   

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड : जलसंपदा विभागातर्फे सन 2017 पासून जलसाक्षरता अभियान राबवले गेले. जलसाक्षरता अभियान राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले. मात्र गांभिर्याच्या अभावामुळे इतर अभियानांप्रमाणे हे अभियानही कागदावरच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. 


शेतीसह पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याबरोबर सांडपाण्याचे प्रदूषण रोखले जावे यासाठी हाती घेतलेल्या अभियानात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रजासत्ताक दिनी प्रत्येक गावात झालेल्या बैठकांत पाणी प्रश्नांचे नियोजन व्हावे यासाठी पुणे येथील "यशदा' कडून ग्रामपंचायतींना सुचना दिल्या. वाळवा तालुक्‍यात एकाही ग्रामपंचायतीने गंभीरपणे चर्चा, विचार केला नाही. त्यामुळे इतर अभियानांप्रमाणे हे अभियानही कागदावरच राहण्याचा धोका आहे. 

सांडपाणी जमीनीत जिरवून गावातील साथीचे आजार रोखणे. जमीन क्षारपड समस्या कमी होण्यासाठी ठिबकचा वापर वाढवण्याबाबत प्रोत्साहित करणे, ओल्या, सुक्‍या कचऱ्याचे नियोजन करुन प्लास्टीक निर्मुलन, वृक्षलागवड व फळबागा लागवड करणे, पावसाचे वाहून जाणारे पाणी पाझर, साठवण तलावांकडे वळवण्यासाठी कामे हाती घेणे यासाठी होणाऱ्या खर्चासाठी रोहयो, कृषी विभागाकडील योजना पर्यायी असून प्रबोधनाची गरज आहे. 

क्षारपड जमीन सुधारणेसाठी शासनाने 80 टक्के निधी देण्याची तरतूद आहे. प्रस्तावित योजनेसाठी पाच कोटींची मर्यादा आहे. शेतकऱ्यांच्या 10 टक्के निधीसह साखर कारखान्यांचा 10 टक्के निधी मिळवून प्रस्ताव तयार करुन क्षारपड जमीन सुधारणा करता येईल. पण गाव पातळीवरील राजकारण, साखर कारखानदारांचा निरुत्साह अडसर ठरत आहे. 

पायथा ते माथा पद्धतीने पाणी निचरा करण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील गावांची एकजूट करुन कामे हाती घेणे गरजेचे आहे. गतवर्षी तालुक्‍यात काही ठिकाणी ओढ्यांची सफाई करण्याची कामे हाती घेण्यात आली. पण नदीमुखापासून म्हणजेच पायथा ते पाणलोट क्षेत्राच्या माथ्याकडे जाणाऱ्या कामाचे स्वरुप नसल्याने ते किती परिणामकारक ठरले ? हा संशोधनाचा विषय झाला आहे. निधी वाया जावून कामे कुचकामी ठरुन पाणी पूढे जाईना. मागून येणारे पाणी थांबेना अशी स्थिती होऊन पाणी मध्येच साचून संकट अधिक गडद झाले. हे तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

क्षारपड सुधारसाठी झटणाऱ्या संस्था, कार्यकर्त्यांनी नैसर्गिक पाणी प्रवाह म्हणजेच ओढे, ओघळी साफ करण्याकडे दुर्लक्ष करुन क्षारपड जमीन सुधारण्यासाठी केलेले कुत्रिम प्रयत्न व्यर्थ ठरतील. पायथा ते माथा पद्धतीने लोक जागृती करुन कामांची गरज आहे. कामे चुकीच्या पद्धतीने झाल्यास योजना फसेल. निधी व्यर्थ जाईल. क्षारपडीचे संकट वाढेल. जमीन वाळवंट तयार होईल. 
- प्रकाश पाटील, पेठ, ता. वाळवा, जि. सांगली. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT