darekar 
पश्चिम महाराष्ट्र

सात्वन करण्यास गेलेल्या  दरेकर यांनाही अश्रू अनावर, करगणीत जाधव कुटुंबाला मदत मिळवून देण्याची ग्वाही 

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली) ः करगणी (ता. आटपाडी) येथील बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शुभम जाधव (वय 20) याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टी पाहणी दौऱ्यातून सवड काढून भेट दिली. त्यांच्याकडे व्यथा मांडताना शुभमच्या माऊलीने हंबरडा फोडला. "माझे लेकरु, माझे पिल्लू मला परत द्या. माझे लेकरु मला पुन्हा हवे आहे. माझा संसार उध्वस्त झाला' असा हृदय पिळवटून टाकणारा टाहो फोडला. दरेकर यांनाही अश्रू अनावर झाले. त्यांनीही शुभमच्या आई-वडील, बहिणीचे सांत्वन करून आधार देण्याचा प्रयत्न केला. 


श्री. दरेकर आटपाडी तालुक्‍यात नुकसानीच्या पाहणीसाठी आले. दिघंची-विठलापूर आटपाडी येथे पाहणी करून करगणी येथील रामनगरमधील शुभम जाधव याचा पाण्यात पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी दरेकर यांनी भेट दिली. शुभमचे कुटुंब अजूनही धक्‍क्‍यातून सावरले नसल्याचे समोर आले. दरेकर यांच्यासमोर माऊली, शुभमच्या बहिणीने हंबरडा फोडला. 


कुटुंबातील इतर सदस्यांनीही हंबरडा फोडला. व्यथा एकून दरेकरनाही अश्रु अनावर झाले. त्यांनी सरकारी दरबारी व्यथा मांडू. जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देऊ, असे सांगितले. तेथे उपस्थित तहसिलदारांशी चर्चा केली. हा विषय संवेदनशील आहे. जिल्हाधिका-यांशी बोलू. लवकर मदत मिळवून देऊ. ताई तुमच्या सोबत आहे. काळजी करु नका अशा शब्दात त्यांनी धीर दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT