Up-to-date library at Atpadi, Competition Examination Center 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडीत उभारतेय अद्ययावत वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र

नागेश गायकवाड

आटपाडी (जि. सांगली) : थोर साहित्यिकांची मोठी परंपरा लाभलेल्या आणि बुद्धीचा सुकाळ असलेल्या माणदेशातील आटपाडीत देशपातळीवरील अद्ययावत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विभुतवाडीचे सुपुत्र व मुंबईचे प्राप्तिकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्या पुढाकारातून साध्या फाउंडेशन केंद्र उभारत आहे. 

माणदेशाला श्रीधर नाझरे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना. स. इनामदार, शांताबाई कांबळे, अरुण कांबळे यांच्यासारख्या थोर साहित्यिक आणि बुद्धिवंतांची मोठी परंपरा लाभली आहे. माणदेशावर भलेही निसर्गाची अवकृपा राहिली असली, तरी बुद्धीचा सुकाळ मात्र कायम राहिला आहे. आजही नव्या पिढीत तोलामोलाचे लेखक, उच्चपदावर अधिकारी म्हणून तरुण पिढी कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षा आणि संशोधनात माणदेशातील तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ठसा उमटवला आहे. 

माणदेशातील कष्टाळू, बुद्धिवंत असलेल्या मात्र आर्थिक परिस्थिती नसलेल्या तरुणांसाठी केंद्रीय लोकसेवा, राज्य लोकसेवा, सरळ सेवा भरतीसाठी स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण केंद्र आणि अद्ययावत देश पातळीवरील नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे ग्रंथालय उभे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विभुतवाडीचे सुपुत्र मुंबईचे प्राप्तिकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून आटपाडीत बाजार समितीसमोर असलेल्या खासगी इमारतीत हे केंद्र सुरू केले जाईल. 

डॉ. सचिन मोटे यांना स्पर्धा परीक्षेचा सराव करताना आलेल्या आर्थिक अडचणी, मार्गदर्शन आणि दर्जेदार पुस्तकांचा अभाव या समस्येतून स्पर्धा परीक्षेचा सराव करणाऱ्या गरजू आणि गरीब तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी हे मोफत केंद्र सुरू केले जाणार आहे. येथे देश पातळीवरील नामवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांचे आठवड्याला व्याख्यान सत्र घेतले जाईल. तसेच, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अनुकूल वातावरण, अद्ययावत सुविधा, संगणक, इंटरनेट, देशपातळीवरील स्पर्धा परीक्षेतील दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. स्पर्धा परीक्षेचे पाच स्टार ग्रंथालय उभारले जाईल. त्यासाठी लागणारे फर्निचर, ग्रंथालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एका महिन्यातच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू होईल. 

मोफत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प  पूर्णत्वाकडे
माणदेशातील तरुण हुशार आहेत. त्यांना योग्य टप्प्यात योग्य दिशा आणि सुविधा मिळाल्या तर मोठ्या पदांना सहज गवसणी घालतील. त्यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प केला होता. तो पूर्णत्वाकडे चालला आहे. 
- डॉ. सचिन मोटे, प्राप्तिकर आयुक्त, मुंबई 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT