Tasgaon
Tasgaon 
पश्चिम महाराष्ट्र

'एसटी वाचवा, एसटी वाढवा' संदेश देत त्यांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस

संपत मोरे

सांगली( तासगांव) : सातारा तालुक्यातील शिवथर येथील दांपत्य शिवराम ठवरे आणि सुनंदा पाटील यांनी आपल्या मुलीच्या स्वराच्या चौथ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तासगाव येथील बसस्थानकावर "एसटी वाचवा"हा जनजागृती कार्यक्रम राबवला. त्यांनी एसटी कामगार संघटनेचे नेते के. डी. शिंदे यांनी लिहिलेल्या "एसटी वाचवा एसटी वाढवा " या पुस्तकाचे मोफत वाटप केले आणि सामान्य माणसाची  एसटी वाचली पाहिजे म्हणून तासगाव एसटी आगारात एक सभा घेतली.त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

ऍड. के. डी. शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, धोरणात्मक निर्णय न घेतल्यामुळे एसटी तोट्यात चालली आहे. लांब पल्याच्या गाड्या खाजगी लोकांच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत. शिवशाही नावाचा बिनकामाचा हत्ती एस.टीकडे पोसायला दिलेला आहे. एसटी कामगारांच्या अनंत अडचणी आहेत पण त्या सोडवण्यासाठी आम्ही स्वस्थ बसणार नाही. सामान्य जनतेच्या आणि निवृत्त एसटी कामगारांच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करून एसटीला गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. 

ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबुराव गुरव म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ अनुभलेली एसटी खाजगीकरणासाठी राज्यकर्ते अडचणीत आणत आहेत. सर्वसामान्य माणसांचे शिक्षण रोजगार आणि विकास बंद व्हावेत, या हेतूने सरकारी उपक्रम काही मोजक्या लोकांच्या नफेखोरीसाठी अडचणीत आणले जात आहेत. गरिबांच्या हक्काची एसटी टिकवण्यासाठी “एसटी वाचवा एसटी वाढवा परिषदे”च्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी सांगितली. 

“गरिबांच्या हक्काची एसटी वाचवा एसटी वाढवा” या पुस्तकाच्या 200 प्रती सुनंदा पाटील आणि शिवराम ठवरे यांचेकडून त्यांची मुलगी स्वराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एसटी कर्मचारी आणि प्रवासी यांना मोफत भेट देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT