kolhapur
kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

सासूचं निधन.. धक्क्यामुळे सुनेनं उडी मारून केली आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : सासूच्या निधनाचा धक्का बसल्याने सूनेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आपटेनगर येथे मुख्य रस्त्यावर आज पहाटे घडली. शुभांगी संदीप लोखंडे (वय 39) असे त्यांचे नाव आहे. सासू सुनेचे एकमेकांवरील अतुट प्रेम आणि त्यातून मनाला चटका लावून देणाऱ्या या घटनेने सारा परिसर हळहळला. मालती मधुकर लोखंडे (वय 70) असे मृत सासूचे नाव आहे. याबाबतची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सुरू होती. 

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून क्रॅशर चौक ते राधानगरी रस्त्यावरील आपटेनगरजवळ रस्त्याला लागून संदीप लोखंडे यांचा बंगला आहे. ते मूळचे आष्टा येथील आहेत. पण गेली अनेक वर्षे कोल्हापुरातच वास्तव्यास आहेत. ते खसगी नोकरी करतात. त्यांचा सांगलीतील शुभांगी यांच्याशी 16 वर्षापूर्वी विवाह झाला. त्यांना 15 वर्षाचा शिवतेज (वय 15) मुलगा आहे. त्यांचे वडील मधुकर लोखंडे व आई मालती लोखंडे हे दोघेही सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांची पत्नी शुभांगी यांचे आई-वडील लहानपणीच गेले. त्यांना तीन बहिणी होत्या. त्यातील दोन बहिणींचाही मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना एकटेएकटे वाटत होते. त्यांचे सासू मालती यांच्यावर खूप प्रेम होत. त्याही तिचे लाड करीत होत्या.

गेल्या आठ दिवसापासून मालती लोखंडे या आजारी होत्या. आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार सून शुभांगी यांना समजला. मात्र सासूचा मृत्यू त्या स्विकारायला तयार नव्हत्या. त्या पहाटे दुसऱ्या मजल्यावरील देवघरात घाईघाईने गेल्या. तेथील उदी घेऊन त्या पहिल्या मजल्यावर आल्या. त्यांनी मृत सासूला उदी लावली व खोलीतही उदी फुंकली. आई उठणार आता असे म्हणत त्या पुन्हा दुसऱ्या मजल्यावर गेल्या. तेथून त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. झालेल्या आवाजाने घरचे धावत धावत बाहेर आले. पण तोपर्यंत त्यांचा म-त्यू झाला होता. सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सूनेने केलेल्या आत्महत्येमुळे घरच्यांबरोबर परिसरातील नागरिकही सुन्न झाले. दहावीची परीक्षा सुरू असलेला शिवतेज हा आई व आजीच्या जाण्याने निशब्द झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT