zp bank of sangali sakal
पश्चिम महाराष्ट्र

DCC Bank of Sangali: जिल्हा बँकेचे पीककर्जाचे 1744 कोटी वसूल

It is mandatory for the DCC Bank to recover the crop loan by June-end: आमदार मानसिंगराव नाईक; वाळवा, कडेगावची सर्वाधिक वसुली

सकाळ वृत्तसेवा

Sangali: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जूनअखेर पीक कर्जाची वसुली करणे बंधनकारक आहे, त्यानुसार पीककर्जाच्या 2239 कोटी रुपये थकबाकीपैकी तब्बल 1744 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. पीककर्जाच्या वसुलीचे प्रमाण 79 टक्के असून वाळवा आणि कडेगाव तालुक्यातील सर्वाधिक वसुली आहे. दुष्काळी जत तालुक्यातील 444 कोटीपैकी 246 कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी आज दिली.

जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेती कारणांसाठी कर्ज वाटप केले जाते. शेती व बिगरशेती कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे एनपीए वाढला होता. मात्र गत दोन वर्षांत बॅँकेतर्फे थकबाकी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पीककर्जाच्या वसुलीला जूनपर्यंत मुदत असते. पीककर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले होते. थकबाकी न भरणाऱ्यांवर बँकेकडून कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.

पीककर्जापैकी जुनी आणि चालू अशी 2 हजार 237 कोटी रुपयांची थकबाकी होती. पैकी 1744 कोटी रुपये जूनअखेर वसुली केली. त्याचे प्रमाण 78 टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून 97.48, त्या खालोखाल वाळव्यातून 97.33 टक्के झाली आहे.

सर्वांत कमी दुष्काळी जत तालुक्यातून 55.51 टक्के झाली आहे. शेतीकर्जाची सर्वाधिक थकबाकी असलेल्या जत तालुक्यातील वसुलीसाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाला लावले होते.

पीककर्जाच्या वसुलीमध्ये मिरज 76.06, तासगाव 67.78, पलूस 85.31, शिराळा 88.56, कवठेमहांकाळ 80.83, खानापूर 90.83 आणि आटपाडी तालुक्यात 88.61 टक्के वसुली झाली. सरकारच्या धोरणांमुळे सर्वच बॅंकांवर परिणाम होतेय.

- शिवाजीराव वाघ, सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PADMA AWARDS: पद्म पुरस्कारांची मोठी घोषणा! तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान

T20 World Cup : पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणता संघ त्यांची जागा घेईल? भारतासमोर बघा कोणता संघ उभा ठाकेल

"होता जिवा म्हणून वाचला शिवा"! शिवरायांचा जीव वाचवणाऱ्या जिवा महालाचे वंशज सध्या कुठे असतात? इतकी दयनीय अवस्था अन् हातावरचं पोट..

Weather Maharashtra : प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्रात पावसाची स्थिती! हवामान अंदाज आला समोर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Padma Awards 2026 List: देशाचा सन्मान, महाराष्ट्राची ओळख; पद्म पुरस्कार २०२६ मध्ये राज्यातील 'ही' व्यक्तिमत्त्वे चमकली

SCROLL FOR NEXT