The dead body of a deceased friend was found under the wheels of a tractor and dumped in the bushes belgum news 
पश्चिम महाराष्ट्र

मित्राच्या मृतदेहाची 'अशी' विल्हेवाट लावणं आलं अगलंट...

सकाळ वृत्तसेवा

हुक्केरी (बेळगाव) - रस्ता ओलांडताना अचानक ट्रॅक्‍टरच्या चाकाखाली  सापडून मृत झालेल्या मित्राचा मृतदेह झुडपात टाकून अपघाताची घटना लपविण्याचा प्रयत्न केला होता. या ट्रॅक्‍टरचालकाला अटक करण्यात यमकनमर्डी पोलिसांना यश आले आहे. बाबू मुलतानी असे मृताचे, तर रमेश कुगटोळी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघेही हुल्लोळी गावचे रहिवासी आहेत. 

तोल गेल्याने तो सापडला चाकात

याबाबत माहिती अशी - अवरगोळ येथील ट्रॅक्‍टर चालक रमेश कुगटोळी हा संकेश्‍वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्याला ऊस नेत होता. कारखान्यात ऊस उतरून चालक रमेश व त्याचा मित्र बाबू मुलतानी हे ऊस भरण्यासाठी जात होते. ट्रॅक्‍टरमध्ये बसलेल्या बाबू मुलतानी याचा तोल गेल्याने तो चाकात सापडला. यात त्याचा मृत्यू झाल्याने मृतदेह घोडगेरीजवळच्या झुडपात फेकून दिला. नंतर बाबूच्या पालकांनी आपला मुलगा एक आठवडा झाला घरी न परतल्याने हुक्केरी पोलिसांत फिर्याद दिली होती. याचा तपास सुरू असताना यमकनमर्डी पोलिस ठाण्यात अनोखळी मृतदेह सापडल्याची  नोंद झाली होती. या मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तो बाबूचा असल्याचे स्पष्ट झाले. हुक्केरीचे मंडल पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डी पोलिसांनी तपास करून दोनच दिवसात आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT